Mumbai Crime News: मुंबईत चाललंय काय? सोन्याच्या दुकानातून दिवसाढवळ्या चोरी; 70 लाख किमतीचे दागिने घेऊन चोरटा पसार

मुंबईच्या गोरेगावमध्ये सोन्याच्या दुकानातून दिवसाढवळ्या दागिने चोरी गेल्याची घटना घडली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv

संजय गडदे

Mumbai Crime News: मुंबईच्या गोरेगावमध्ये सोन्याच्या दुकानातून दिवसाढवळ्या दागिने चोरी गेल्याची घटना घडली आहे. ज्वेलर्समधील कामगाराच्या तोंडाला बळजबरीने रूमाल लावून बेशुद्ध करत चोरट्याने चोरीचं कृत्य केलं आहे. चोरीच्या घटनेने परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच दहशत पसरली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील गोरेगावच्या पश्चिमेकडील जवाहर नगर रोड या परिसरातील सोन्याच्या दुकानातून दिवसाढवळ्या दागिने चोरी गेल्याची घटना घडली. चोरट्याने कामगाराच्या तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध करत ७४,६०,०००/- किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करून चोर फरार झाला आहे.

Mumbai Crime News
Pune Crime News: आता काय म्हणावं? मटणावरून वाद टोकाला; पतीने पत्नीच्या डोक्यात मारला मासे कापण्याचा कोयता

गोरेगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक तपासाच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून ७४,२५,००० किमतीचे दागिने व रोख रक्कम हस्तगत केले आहे. सुरेश लेहूरलाल लोहार असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव परिसरातील करघर ज्वेलर्स मध्ये दोन अनोळखी इसम दुकानात शिरून दुकानात काम करणाऱ्या कामगाराला बळजबरीने तोंडाला रुमाल लावून बेशुद्ध केले आणि दुकानातील ७४,६०,०००/- किमतीचे सोन्या चांदीचे - दागिने माल चोरी करून फरार झाले. याबाबत दुकान मालकाकडून गोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार देण्यात आली.

दरम्यान, गुन्ह्याची गांभीर्य पाहता गुन्हयाच्या तपासकामी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव, मालाड, बांगूर नगर, चारकोप, मालवणी या पोलीस ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विशेष पथके बनवून गुन्हयातील आरोपीचा कौशल्याने व शिताफीने शोध घेतला.

Mumbai Crime News
Kalyan Crime News: धक्कादायक! तलवारीने हल्ला करत हॉटेल मॅनेजरला लुटले; दीड लाखाची रोकड लंपास

पोलिसांनी यासाठी गोरेगाव, दहिसर, विरार, बडोदा, राजस्थान इ. परिसरात सीसीटीव्ही फुटेज पाहणी केली. त्याचबरोबर गुन्हयात चोरलेला डीव्हीआर प्राप्त करून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून पोलिसांनी एकूण ७४,२५,००० किमतीचे सोन्या चांदीचे - दागिने हस्तगत केले. दरम्यान पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com