Crime: अंधश्रद्धेच्या नावाखाली अघोरी कृत्य, अडीच वर्षांच्या चिमुकल्याला चटके, अमानुष मारहाण

Mumbai Bhandup Crime News: मुंबईच्या भांडुपमध्ये अंधश्रद्धेच्या नावाखाली चिमुकल्याला चटके दिल्याचे आणि अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी नवरा-बायकोला अटक करण्यात आली.
Mumbai Bhandup Crime News
Mumbai Bhandup Crime NewsSaam Tv
Published On

भूत उतरवण्याच्या नावाखाली अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या अंगाला चटके दिल्याच्या आणि त्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईच्या भांडूप परिसरात घडली आहे. मुलगा सतत रडत असल्यामुळे त्याला भूतबाधा झाली असल्याचे सांगून नवरा-बायकोना त्याच्यासोबत हे भयंकर कृत्य केले. मुलाच्या आईने त्यांना उडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांन तिला एका खोलीत डांबून ठेवले. शुद्धीवर आल्यानंतर या महिलेने नातेवाईकांना फोन करन घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ही भयंकर घटना समोर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भांडुपमध्ये वैभव कोकरे आणि हर्षदा गुरव हे नवरा-बायको राहतात. त्यांची बाटली बंद पाण्याची एजन्सी आहे. याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेला कामाची गरज होती त्यामुळे ती त्यांच्या इथे काम करत होती. वैभव कोकरेने या महिलेल्या आमच्या घरी घरकाम करशिल का असे विचारले. कामाची गरज असल्यामुळे आणि नवरा अंथरूणावर पडून असल्यामुळे या महिलेने कामाला होकार दिला आणि ती त्यांच्या घरी काम करू लागली. मुलाला सांभाळायला घरी कुणीच नसल्यामुळे ती आपल्या मुलाला देखील कामावर घेऊन येत होती.

Mumbai Bhandup Crime News
Crime: दुचाकीवरून आले अन् बेछूट गोळीबार; कुख्यात गुंडाच्या आईची भररस्त्यात हत्या, बॉडीगार्ड रक्तबंबाळ

१५ जूनला ही महिला नेहमी प्रमाणे कोकरेंच्या घरी कामासाठी आली. तिने आपल्या मुलाला सोबत आणले होते. हे मूल सतत रडत होते. त्यामुळे त्याला भूतबाधा झाली असल्याचे सांगून कोकर दाम्पत्याने त्याला माचिसच्या काडीचे चटके दिले आणि वेताच्या काठीने त्याला मारहाण केली. मुल जोरजोरात रडत असल्यामुळे त्याची आई त्याला वाचवण्यासाठी आली. तर कोकरे दाम्पत्यांनी तिला ढकलून दिले आणि दोन दिवस एका खोलीमध्ये डांबून ठेवले. सोमवारपासून तिचा कुटुंबीयांशी संपर्क झाला नव्हता.

Mumbai Bhandup Crime News
Delhi Crime: पेशंटकडून महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू; रुग्णालयात काळीमा फासणारी घटना

शुद्ध आल्यानंतर या महिलेने आपल्या कुटुंबीयांना फोन करून घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि कोकरेंच्या घरी असल्याचे सांगितले. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी कोकरेंच्या घरी येत पीडित महिला आणि तिच्या मुलाची सुटका केली. त्यानंतर महिलेने पोलिस ठाणे गाठत कोकरे दाम्पत्यांविरोधात तक्रार केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

Mumbai Bhandup Crime News
Delhi Crime: पेशंटकडून महिला रुग्णावर लैंगिक अत्याचार, पीडितेचा मृत्यू; रुग्णालयात काळीमा फासणारी घटना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com