Mumbai News: प्रेयसीवर संशय घेत तरुणाचं भयंकर कृत्य! आधी तरुणीवर केला चाकूने हल्ला नंतर...

Mumbai Crime News: Crime: याप्रकरणी आरोपीविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime Newssaam tv
Published On: 

>> संजय गडदे

Mumbai Crime: आपल्याला अंधारात ठेवून प्रेयसी इतर तरुणांबरोबर फिरत असल्याच्या संशयावरून तरूणाने प्रेयसी आणि तिच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे घडला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांनाही सांताक्रुज पूर्वेकडील व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शेख असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तरूणी उर्वी रावल (३१) शाझिया खान, रिफाकत वडगामा आणि इतर सर्व मित्र फराज अन्सारी याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास होलीक्रॉस कम्युनिटीजवळ फिरण्यासाठी गेले. त्यावेळी मुंब्रा येथे राहणारा रावलचा प्रियकर समीर शेख तेथे आला.

Mumbai Crime News
QR Code For Mango: क्यूआर कोडवरून कळणार आंब्याचं नाव, गाव अन् पत्ता! फसवणूक टाळ्यासाठी भन्नाट प्रयोग

प्रेयसी आणि तिच्या मित्रावर चाकूने हल्ला

त्याने तरुणीचा फोन हिसकावून घेत तिला मारहाण केली. तसेच तिच्या मित्राकडे बोट दाखवत तो कोण आहे, असे विचारले. तरुणीने त्याला उत्तर देत तो तिचा मित्र असल्याचे सांगितले. यानंतर आरोपी तरुणाने तिला शिवीगाळ केली. तसेच चाकू काढला आणि तिच्यावर हल्ला केला. यादरम्यान तिच्या मित्राने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीने त्याच्यावरही चाकूने हल्ला केला अशी तक्रार वाकोला पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. (Mumbai News)

Mumbai Crime News
ED seized Poonawalla properties: ईडीची मोठी कारवाई! झवरेह सोली पूनावाला यांच्या ४१ कोटींच्या स्थावर मालमत्ता जप्त

प्रेयसीवर संशायतून केला हल्ला

या घटनेनंतर तरुणीच्या इतर मित्रांनी तिला आणि तिच्या मित्राला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. या प्रकऱणात पीडित तरुणीच्या मैत्रीनीने दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी आरोपी तरुण समीर शेखविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुणी दुसऱ्या तरूणाला भेटते या संशयावरून गेल्या दोन महिन्यांपासून आरोपी शेख तिच्याशी भांडत होता असेल तिच्या मैत्रिणीने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असून आरोपी तरुणाचा शोध सुरू केला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com