Mumbai Crime : अनैतिक संबंधांत पतीचा अडथळा; पत्नीनंच जेवणातून विष घालून संपवलं, २ मुलं झाली पोरकी

पत्नीचे अनैतिक संबंध होते. अडथळा ठरणाऱ्या पतीची तिने विष देऊन हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईत ही घटना घडली.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSAAM TV
Published On

Mumbai Crime News : मुंबईत धक्कादायक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीची त्याच्या पत्नीनेच जेवणातून विष देत हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्यानं पतीच्या हत्येचा कट तिने आखला होता.

पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सांताक्रूझ परिसरात ही धक्कादायक घटना घडली. अनैतिक संबंधांतून पत्नीने पती कमलकांत याला जेवणातून विष देत हत्या केली. त्यासाठी आरोपी महिलेने प्रियकराची मदत घेतल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

Mumbai Crime News
Daryapur News: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणीचा मॉर्निंग वॉक करताना अपघाती मृत्यू

आरोपी महिला कविता हिचे अनैतिक संबंध होते. कविता आणि पती कमलकांत हे दोघे सांताक्रूझ परिसरातील दत्तात्रेय रोड भागातील एका सोसायटीत राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. अनैतिक संबंधांमध्ये कमलकांत हा अडथळा ठरत होता. हा अडथळा कायमचा दूर करायचा असा कट महिलेने प्रियकरासोबत संगनमत करून आखला.

जूनमध्ये कवितानं प्रियकराच्या मदतीने कमलकांतच्या जेवणात विष टाकले. त्यानंतर कमलकांत याला रुग्णालयात दाखल केले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला अपमृत्यूची नोंद केली. सांताक्रूझ पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद केली. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Aurangabad News: कृषी मंत्र्यांच्या मतदार संघात शेकऱ्यांच्या आत्महत्या; ३ दिवसात २ तरुणांनी संपवली जीवन यात्रा

सांताक्रूझ पोलिसांनी तपास सुरू केला. तपास सुरू असतानाच कमलकांत याची विष देऊन हत्या केल्याची बाब समोर आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून कविता आणि तिचा प्रियकर हितेश या दोघांना अटक केली. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांत भारतीय दंड विधान कलम 302, 328, 120 बी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com