Covid Center Scam: मुंबईतील कथित 100 कोटींच्या कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, दोघांना अटक

राजीव साळुंखे आणि सुनील कदम यांना अटक करण्यात आली आहे.
Mumbai Police
Mumbai PoliceSaam TV
Published On

>> सुशांत सांवत

मुंबई : मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. राजीव साळुंखे आणि सुनील कदम यांना अटक करण्यात आली आहे.

लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिस आणि इतरांवर कागदांची फेरफार करून कंत्राट घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. (Mumbai News)

Mumbai Police
Bachchu Kadu News: तुम्ही गद्दार आहात; आजोबांनी बच्चू कडूंना गाडी अडवून झाप झाप झापलं... पाहा व्हिडीओ

KEM हॉस्पिटल जवळील राजू चहावाला (राजीव नंदकुमार साळुंखे) व सुनील (बाळा) कदम यांना मुंबई पोलिसांनी आज भा.द.वि. कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 304(A) अंतर्गत अटक केली. आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे 24/8/2022 रोजी किरीट सोमैया यांनी FIR क्र. 756 दाखल केली होती.

सुजित पाटकरांचा (संजय राऊत यांचे पार्टनर) लाईफलाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस कंपनीचा हा 100 कोटींचा कोविड सेंटर घोटाळा असून पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.

Mumbai Police
Cobra Video: भलामोठा किंग कोब्रा जेव्हा उभा राहतो; तुमच्या डोळ्यांनाही विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

किरीट सोमय्यांची टीका

मुंबईतील कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांना आज सुजीत पाटकरचा पार्टनर राजू चहावाला आणि सुनील कदमला अटक केली आहे. न जन्माला आलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे सरकारने 100 कोटींचं कंत्राट दिलं होतं. आता हिशेब घेणारच, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com