Cobra Video: भलामोठा किंग कोब्रा जेव्हा उभा राहतो; तुमच्या डोळ्यांनाही विश्वास बसणार नाही, पाहा व्हिडीओ

IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Cobra
Cobra Saam TV
Published On

Viral Video : साप उभा राहू शकतो का? असं विचारलं तर तुमचं उत्तर नाहीच असेल. सापाला पायच नाहीत तर तो उभा कसा राहू शकतो. तुमचं हे लॉजिक योग्य आहे. पण IFS अधिकारी सुसांता नंदा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, तो व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. (Viral Video)

सरपटणारा साप तुम्ही अनेकांनी पाहिला असेल. मात्र साप उभा राहू शकतो हे या व्हिडीओतून दिसत आहे. कोब्रा साप जगातील सर्वात धोकादायक साप मानला जातो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे कोब्रा दूरच्या गोष्टी स्पष्ट पाहण्यासाठी अशा प्रकारे उभा राहतो.

Cobra
Bachchu Kadu News: तुम्ही गद्दार आहात; आजोबांनी बच्चू कडूंना गाडी अडवून झाप झाप झापलं... पाहा व्हिडीओ

कोब्रा साप उभा राहण्याचं हे दुर्मिळ दृष्य आहे. याबाबत सुसांता नंदा यांनी लिहिलं की, किंग कोब्रा त्याच्या शरीराचा एक तृतीयांश भाग हवेत उचलू शकतो. बर्‍याच लोकांनी ट्विटरवर असे लिहिले आहे की साप हे करू शकतो याची त्यांना खात्री नाही.

नंदा यांच्या पोस्टवर सीआरपीएफ सेवानिवृत्त आयजी कुलबीर सिंह यांनी लिहिलं की, साप जमिनीवरील कंपनांद्वारे आजूबाजूच्या गोष्टी ऐकण्यास सक्षम आहे. पण या फोटोवरून असे दिसते आहे की कोब्रा दूरवरुन पाहू शकतो.मग या उंचीवर शरीराचा वरचा भाग उचलण्याचा सापाचा खरा हेतू सांगा.

Cobra
Nandurbar Accident News: यात्रेसाठी निघालेली भाविकांची ओव्हरलोड गाडी नाल्यात कोसळली; तीन मुलांसह चौघांचा मृत्यू, 50 जण जखमी

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओला चांगली पसंती मिळत आहे. व्हिडिओला आतापर्यंत तो अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले असून हजारहून अधिक लोकांना रिट्वीट केलं आहे.ही संख्या सातत्याने वाढत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com