Mumbai News : मुंबईत 37 लाखांचं विदेशी मद्य जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

Mumbai Crime News : मुंबईच्या वरळी आणि अंधेरी पश्चिम लोखंडवाला अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 37 लाख 28 हजार 560 रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले आहे.
Mumbai News
Mumbai NewsSaam Tv

Mumbai News

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहितेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य उत्पन्न शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईच्या वरळी आणि अंधेरी पश्चिम लोखंडवाला अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत तब्बल 37 लाख 28 हजार 560 रुपये किमतीचे विदेशी मद्य जप्त केले आहे. याप्रकरणी सतीश शिवलाल पटेल (३५ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आलं आहे. हे विदेशी मद्य विदेशातून आयात करून दिल्लीवरून मुंबईला आणलं जात होतं. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनीयम १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ९०, ९८ व १०३ अन्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

अलिबागच्या खांदेरी किल्ल्याजवळ भाविकांची बोट समुद्रात कलंडली

अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्यावर गेलेल्या भाविकांची बोट समुद्रात कलंडली. सुदैवाने बोटीवरील 10 ते 12 जण सुखरूप बचावले. ही घटना 31 मार्च म्हणजे रविवारची आहे. बोट कलंडतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय. हे सर्वजण खांदेरी किल्ल्यावरील वेताळ देवाच्या दर्शनासाठी गेले होते. परतत असताना किल्ल्याजवळच बोट पाण्याच्या माऱ्याने कलंडली आणि बोटीवरील सर्वजण पाण्यात कोसळले. सुदैवाने हे सर्वजण पट्टीचे पोहणारे असल्याने सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले आणि मोठा अनर्थ टळला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Pakistan Crime : धक्कादायक! बापासमोर भावाने केली बहिणीची हत्या, परिसरात खळबळ

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर जीवघेणा हल्ला

पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असलेल्या पतीने चाकूने प्राण घातक हल्ला केल्याची घटना डोंबिवली (Dombivali) नांदिवली टेकडी परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर (Mumbai) मुंबई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीवर हल्ला करून पती राजू हिवाळे हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Live Marathi News)

Mumbai News
Crime News: IPL तिकीटं विकण्यासाठी बोगस वेबसाइट, सूरत कनेक्शन; सौदी अरेबियात पोर्टलचं डिझाइन, हाँगकाँगमध्ये सर्व्हर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com