Sanjay Raut News : संजय राऊतांची दिवाळी तुरुंगातच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.
Sanjay Raut Latest News
Sanjay Raut Latest NewsSaam TV
Published On

मुंबई : पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिवाळी जेलमध्येच होणार आहे. कारण न्यायालयाने त्यांची जामिनासंदर्भातील सुनावणी 2 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

आज कोर्टात काय घडलं?

ईडीने जे आरोप केलेले आहेत, त्याचा कुठलाही संबध लागत नाही. यात संजय राऊत यांचा प्रत्यक्षरित्याकाहीही संबध लागत नाही. प्रविण राऊत यांना जे पैसे मिळाले ते पीएमसी बँकेशी संदर्भात होते. पण राऊत यांचा काहीही संबध नसताना त्यांची प्रॉपर्टी का जप्त केली, असा युक्तीवाद राऊतांच्या वकिलांनी आज कोर्टात केला. (Latest News)

Sanjay Raut Latest News
Mumbai Police : मुंबईला कसला धोका?, पोलिसांकडून तात्काळ ऑर्डर; १५ दिवस ५ पेक्षा जास्त लोक जमू नका!

प्रविण राऊत यांच्याकडून आलेत म्हणजे ते पीएमसी बॅकेच्या गैरव्यवहार संबधतीतच आहेत असे नाही. त्यात अनेकांनी पैसे स्वीकारलेले आहेत. यात अशाही दोन व्यक्ती आहेत त्यांनीही पैसे दिलेले आहेत मग ते कुठे आहेत. स्वप्ना पाटकरांनी त्यांच्या जबाबातही म्हटले आहे की, मी कुणालाही भेटलेले नाही. सुजीत पाटकर यांनी म्हटलयं जे व्यवहार झालेत स्वप्ना पाटकरांच्या कार्यालयात झाले असून ते व्यवहार स्वप्ना पाटकर यांनी केलेले आहेत, असंही वकिलांनी कोर्टात सांगितलं.

Sanjay Raut Latest News
Sarthi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जातीने लक्ष घालून सारथीचं काम केलं; संभाजीराजेंकडून कौतुक

इथे फक्त पैसे दिलेल आहेत पण कुणी कुणाला देले ते स्पष्टच होत नाही. जो तो एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. प्रत्येकाने काही ना काही केलेलं आहे. तर जबाबात साम्य का नाही. वेळोवेळी जबाब बदलत आहे. त्यामुळे संजय राऊतांचा सहभाग स्पष्ट नाही. मग त्यावर कसा विश्वास ठेवायचा. हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे ईडीला आपलं उत्तर दाखल करू द्या, त्यावर आम्ही उत्तर देतो, असं राऊतांच्या वकिलांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com