Mumbai News: आजारपणाचे कारण सांगून गणेशोत्सवाला गावी जाणे पडले महागात; आयुक्तांकडून पोलीस निरीक्षकाचे निलंबन

Mumbai Police News: आजारी असल्याचे खोटे कारण सांगून सुट्टी घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Mumbai Police Viral News
Mumbai Police Viral NewsSaam Tv
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी

Mumbai News:

कामावरुन सुट्टी मिळत नसल्यास अनेकजण आजारी असल्याचे कारण सांगतात. आजारपणाचे कारण सांगून सुट्टी घेण्याचा असाच एक प्रकार पोलीस निरीक्षकाला चांगलाच महागात पडला आहे. आजारी असल्याचे खोटे कारण सांगून सुट्टी घेतल्याने पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Mumbai Police Viral News
Kolhapur Ganpati Visarjan : बाप्पांच्या विसर्जनासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पंचगंगा नदी परिसरात पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आजारपणाचे खोटे कारण देवून सुट्टी घेणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. घाटकोपर (Ghatkopar) मुख्यालयात असलेल्या राखीव पोलीस निरीक्षक संजय सावंत यांनी गणपतीला (Ganapati Festival 2023) गावी कणकवलीला जाण्यासाठी रजा मागितली होती. सुट्टी दिल्यानंतर ते थेट गणपतीसाठी गावी गेले.

मात्र त्यांच्या आजारपणाबद्दल शंका आल्याने चौकशी केली असता त्यांचा फोन बंद लागला. तसेच त्यांच्या घरी जावून विचारणा केली असता मुलाने गावी कणकवलीला गेल्याचे सांगितले. ज्यानंतर त्यांच्यावर निलंंबनाची कारवाई करण्यात आली.

गणेशोत्सव सुरू असल्याने राज्यभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. अशावेळी खोटे कारण देवून सुट्टी घेतल्याने ही कडक कारवाई करण्यात आल्याचे वरिष्ठांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

Mumbai Police Viral News
Amit Shah News: मुंबई दौऱ्याआधी अमित शहांचं मराठीत ट्वीट; म्हणाले, 'लालबागचा राजा'च्या दर्शनासाठी...'

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com