Mumbai News: ५० हून अधिक गंभीर गुन्हे, टोळी होती दरोड्याच्या तयारीत; फक्त संशयावरून पोलिसांनी...

अट्टल दरोडेखोरांची टोळी मुंबईतील एका शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत होती.
Mumbai Police News Update
Mumbai Police News UpdateSAAM TV
Published On

Mumbai Crime News | मुंबई: मुंबईच्या दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अलंकार शॉपिंग सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या तीन आरोपींच्या दिंडोशी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींकडून चॉपर, रॉड, दोन मोबाइल, लाल मिरचीची पावडर आणि धारदार शस्त्रे देखील जप्त केली आहेत.

अफजल अस्लम खान उर (वय २३), अरिफ शफी अहमद अन्सारी (वय २९), विघ्नेश वेंकटेश देवेंद्र (वय १९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी गोरेगाव पूर्वेकडील संतोष नगरातील राहणारे आहेत.

Mumbai Police News Update
Gondia: 120 विद्यार्थ्यांना कोंबून नेल्याप्रकरणी 4 शिक्षकासह ट्रक चालकावर गुन्हा

याबाबत झोन १२ चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सविस्तर माहिती दिली. २४ सप्टेंबर रोजी पहाटे दिंडोशी पोलीस नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. त्याचवेळी काही तरुणांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. यानंतर गस्तीवरील पोलिसांनी (Mumbai Police) तरुणांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दिंडोशी पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली. तीन आरोपी फरार झाले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर चोरी, लुटमार अशा गंभीर प्रकारचे ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. हे गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत.

आरोपींनी दरोडा (Robbery) घालण्यापूर्वी अंधेरी परिसरातून एक रिक्षा देखील चोरी केली होती. मात्र दिंडोशी पोलिसांनी तत्परता दाखवत यातील तिघांना दरोडा टाकण्यापूर्वीच ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींवर ५०हून अधिक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्रे, चोरीचे दोन मोबाइल आणि चोरीची रिक्षा देखील ताब्यात घेतली आहे.

Mumbai Police News Update
Breaking News : भरदिवसा चाैकात राडा; 'एमआयएम' च्या माजी नगरसेवकावर हल्ला

दिंडोशी पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, या आरोपींवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चोरी, खंडणी, ड्रग तस्करी, आणि मारहाण प्रकरणे असे ५० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व सराईत गुन्हेगार असून इतर तीन गुन्हेगारांचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com