Dharavi Fire News: धारावीत भीषण अग्नितांडव; जिमला लागलेल्या आगीत ६ जण जखमी

Massive Fire Breaks Out In Dharavi: धारावीत आग लागल्याची घटना घडली आहे. यात सहाजण जखमी झालेत.
धारावीत आग लागल्याची घटना
Dharavi Fire NewsSaam Tv

धारावीतील एका गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सहाजण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या होत्या. आज पहाटे ही आग लागल्याची माहिती मिळत आहेत. धारावीत आग लागलेल्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगात बचावकार्य सुरू आहे.

धारावीतील अशोक मिल कंपाउंड रोडवरील कला किला येथे ही आगीची घटना घडली आहे. ही जमिनीपासून गोदामाच्या वरच्या (Dharavi Fire News) तीन मजल्यांपर्यंत पोहोचली होती. या घटनेत इमारतीमधील लाकडी साहित्य आणि फर्निचर जळाल्याची माहिती मिळत आहे. धारावीत अशोक मिल कंपाऊंडमध्ये कमर्शियल गरमेट, जिमला पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास आग लागली होती.

घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच सहा अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. या आगीत एकूण ६ जण जखमी झाले असून त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग पूर्णपणे नियंत्रणात आली असून कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष सावंत यांनी दिली आहे.

मुंबईमध्ये धारावीत गोदामाला आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दल ही आग (Fire News) विझविण्याचं काम पहाटेपासुन करत होते. सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु या आगीत सहा लोकं होरपळल्याची माहिती मिळत आहे. त्यांना आगीतून बाहेर काढून उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. काही लोकांवर उपचार सुरू आहेत. तर काहींवर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती मिळतेय, आग का लागली याचं कारण अजून स्पष्ट (Mumbai News) झालेलं नाही.

धारावीत आग लागल्याची घटना
Delhi Fire News: दिल्लीतील आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 21 गाड्या घटनास्थळी दाखल

आगीत जखमी झालेले सलमान खान ( वय २६ वर्षे) ८ ते १० टक्के भाजले असल्याची माहिती मिळत आहे. मनोज (वय २६ वर्षे) ८ ते १० टक्के भाजले आहेत. अमजद ( वय २२ वर्षे ) हे ४० ते ५० टक्के भाजले असल्याची माहिती (Mumbai Fire News) मिळतेय. सल्लाउद्दीन ( वय ४० वर्षे ) हे ४० ते ५० टक्के भाजले आहेत. सैदुल रहमान वय २६ वर्षे) हे ३५ ते ४० टक्के भाजले आहेत. रफिक अहमद ( वय २६ वर्षे) यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत. सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

धारावीत आग लागल्याची घटना
Jalna Fire News : गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने घराला आग; आगीत अन्नधान्यासह साडेचार लाखाचे नुकसान 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com