Andheri Fire News: वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग, आगीत अनेक वस्तू जळून खाक

Andheri Massive Fire Breaks Out Shop: अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा गावातील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि अदानी इलेक्ट्रिसिटीचे पथक घटनास्थळी दाखल झाले.
Andheri Fire News: वर्सोवा गावातील दुकानाला भीषण आग, आगीत अनेक वस्तू जळून खाक
Published On
Summary
  • वर्सोवा गावातील बुधा गल्लीमध्ये दुकानाला भीषण आग लागलीय.

  • अग्निशमन दल आणि आदानी इलेक्ट्रिसिटीची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत.

  • आग नियंत्रणासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

संजय गडदे, साम प्रतिनिधी

अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा येथील बुधा गलेतील एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडलीय. आगीची माहिती मिळतात वर्सोवा पोलीस, मुंबई अग्निशमन दल आणि आदानी इलेक्ट्रिसिटीचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झालेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेलं दुकान हे खेळण्याचे दुकान आहे. आगीत दुकानातील अनेक वस्तू जळून खाक दरम्यान दुकानाला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. साडेसहा वाजण्याच्या सुमारास खेळण्याच्या दुकानात आग लागली. प्लास्टिक आणि कागद मोठ्या प्रमाणावर असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. आगीत पूर्ण दुकान जाळून खाक झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com