Covid Body Bag Scam: कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरण! किशोरी पेडणेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

Kishori Pednekar: कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकरांवर आहे.
A case has been filed against Mumbai former mayor Kishori Pednekar in Covid center scam
A case has been filed against Mumbai former mayor Kishori Pednekar in Covid center scamSaam TV
Published On

सचिन गाड, प्रतिनिधी...

Mumbai News: कोरोनाकाळात वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांंनी दाखल केलेल्या एफआयआरची प्रत, तसेच आनुषंगिक कागदपत्रे ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागवली होती. त्यामुळे किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम दिलासा दिला आहे.

A case has been filed against Mumbai former mayor Kishori Pednekar in Covid center scam
Solapur News: प्रसिद्धीसाठी शेतकऱ्याचा भलताच प्रताप! टोमॅटो चोरीची अफवा पसरवली; पोलीस थेट शेतात आले अन्...

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या (Mumbai) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला आहे. बॉडी बॅग किट खरेदीत गैरव्यवहार प्रकरणात २८ ऑगस्टपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने ईओडब्ल्यूला दिले आहेत. या प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या तर्फे अटकपूर्व जामिन अर्ज दाखल करण्यात आला होता.

किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप आहेत. कोरोना (Corona) काळात बॉडी बॅग प्रकरणात किशोरी पेडणेकर यांनी 50 लाखांचा घोटाळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कोरोना काळात मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडी बॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. यातील एक बॅग 1300 रुपयांना होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून ही एक बॅग 6800 रुपयांना खरेदी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

A case has been filed against Mumbai former mayor Kishori Pednekar in Covid center scam
Pune Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण समारंभाला CM शिंदेंची दांडी? राजकीय चर्चांना उधाण

या प्रकरणात एकूण चार जणांवर झाला गुन्हा दाखल आहे. यामध्ये किशोरी पेडणेकर, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू आणि परचेस डिपार्टमेंटचे उपायुक्त रमाकांत बिरादर व वेदांत इंनोटेक लिमिटेड यांची नावे आहेत. दरम्यान, या प्रकरणात कुठलेही पुरावे नाहीत आणि त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा किशोरी पेडणेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com