Pune Chandni Chowk: पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण समारंभाला CM शिंदेंची दांडी? राजकीय चर्चांना उधाण

Pune Chandni Chowk News: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समारंभाला येणार नसल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.
Cm Eknath Shinde will not come to pune chandni chowk opening ceremony What is reason
Cm Eknath Shinde will not come to pune chandni chowk opening ceremony What is reason Saam TV

Pune Chandni Chowk News: पुणेकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. कारण, पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरातील उड्डाणपुलाचे आज केंद्रीय नितीन गडकरी यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. या समारंभाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील काही मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)

Cm Eknath Shinde will not come to pune chandni chowk opening ceremony What is reason
Maharashtra Politics: शिंदे गटातील खासदारांच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीचा डोळा? आगामी लोकसभेसाठी अजित पवारांचा मोठा प्लॅन

मात्र, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या समारंभाला येणार नसल्याचं वृत्त आहे. यामुळे राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरु असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अख्यत्यारित खात्यांचा अजित पवार यांनी आढावा घेतला. यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे अजित पवार यांचा गट एकनाथ शिंदे यांच्या गटातील १३ खासदारांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरू करणार आहे. यामुळेही शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे.

Cm Eknath Shinde will not come to pune chandni chowk opening ceremony What is reason
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक पाहाच...

CM शिंदेंना बसला होता वाहतूक कोंडीचा फटका

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही १० महिन्यांपूर्वी चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला होता. ते साताऱ्याकडे जात असताना वाहतूक कोंडीत अडकले होते. यावेळी पुणेकरांनी ही समस्या त्यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर पुलाचे काम करण्याचे आदेश दिले होते. परंतु आता तेच समारंभाला येणार नसल्याचे वृत्त आहे.

असे आहेत चांदणी चौकातील ८ रॅम्प....

१. मुळशी - सातारा

२. मुळशी - मुबंई

३. मुळशी - पाषाण

४. सातारा - कोथरूड ते मुळशी

५. पाषाण - मुबंई

६ .पाषाण - सातारा

७. सातारा - कोथरूड ते पाषाण

८ . सातारा -मुळशी

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com