Mumbai News | मुंबईकरांनो काळजी घ्या; शहरात डेंग्यू-मलेरियाचे रुग्ण वाढले

मुंबईत एकीकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. तर दुसरीकडे मुंबईत मलेरिया, डेंग्यू यांसाख्या आजारानेही डोके वर काढले आहे.
mumbai news
mumbai news saam tv
Published On

Mumbai news : मुंबई, ठाण्यात एकीकडे स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत आहेत. तर दुसरीकडे मुंबईत मलेरिया, डेंग्यू यांसाख्या आजारानेही डोके वर काढले आहे. मुंबईत (Mumbai) गेल्या २१ दिवसांच्या कालावधीत हिवतापाचे (मलेरिया) ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर डेंग्यूचे १०५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईतील नागरिकांची चिंता वाढली आहे.

mumbai news
Akola News : वेशांतर करून मुलींच्या वसतीगृहात शिरला मुलगा; धक्कादायक VIDEO व्हायरल

मुंबईत स्वाइन फ्लूच्या रुग्णानंतर आता शहरात साथीच्या आजाराने थैमान घातलं आहे. मुंबईत १ ते २१ ऑगस्ट २०२२ या केवळ २१ दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबईत हिवतापाचे (मलेरिया) ५०९ रुग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधी दरम्यान डेंग्यूचे १०५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

mumbai news
मोठी बातमी! नरसिंहानंद, आचार्य, रिझवी होते दहशतवाद्यांचे टार्गेट; पुणे एटीएसची माहिती

'सदर दोन्ही आजारांचा प्रसार हा डासांमुळे होतो. यापैकी हिवताप या आजाराचा प्रसार ‘एनोफिलीस’ डासांमुळे, तर डेंगीचा प्रसार 'एडिस' डासांमुळे होतो. या डासांची उत्पत्ती ही साचलेल्या काही थेंब पाण्यामध्येही होऊ शकते, अशी माहिती मुंबईच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार दिली आहे.

उदाहरणार्थ बाटलीचं झाकण, टायर, थर्माकोल, नारळाच्या करवंट्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाटाचा (रेफ्रिजरेटर) डिफ्रॉस्ट ट्रे, रिकामी शहाळी, रोप कुंड्यांखालील ताटल्या यासारख्या विविध वस्तुंमध्ये साचलेल्या काही थेंब पाण्यातही उत्पन्न होणारे डास; हे डेंगी (Dengue), हिवताप (Malaria) यासारख्या घातक रोगांच्या प्रसारासाठी कारणीभूत ठरतात. त्याचमुळे पाणी साचेल अशा वस्तू सातत्याने हटविणे व त्यात साचलेले पाणी नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com