मोठी बातमी! नरसिंहानंद, आचार्य, रिझवी होते दहशतवाद्यांचे टार्गेट; पुणे एटीएसची माहिती

पुण्यातून अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले करणार होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Narasihananda Saraswati, Jitendra Narayan, Sandeep Acharya
Narasihananda Saraswati, Jitendra Narayan, Sandeep AcharyaSaam Tv
Published On

सचिन जाधव

पुणे: पुण्यातून (Pune) अटक करण्यात आलेला संशयित दहशतवादी जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील तीन प्रमुख लोकांवर हल्ले करणार होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे तीन व्यक्ती म्हणजे नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिजवी, अशी माहिती समोर आली आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, नरसिंहानंद सरस्वती, गायक संदीप आचार्य आणि जितेंद्र नारायण उर्फ वसीम रिझवी या तीन लोकांवर हल्ला करण्याची योजना पु्ण्यातून अटक करण्यात आलेले संशयीत दहशतवादी आखत होते. इतकेच नाही तर उत्तर भारतात आगामी काळात होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) रॅलीवर देखील हल्ला करायण्याचा प्लॅन बनवला होता.

Narasihananda Saraswati, Jitendra Narayan, Sandeep Acharya
गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड, नौदलाने केली प्रवाशांची सुटका

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटके बनवायला लागणाऱ्या गोष्टी आणि पैसे हे थेट पाकिस्तानात बसलेल्या एका मास्टरमाईंडकडून येणार होते, अशीही माहिती समोर आली आहे. जो प्लॅन आखला जाणार होता, त्यासाठी जुनेद मोहम्मद निघण्याच्या तयारीत होता. मात्र त्या आधीच राज्य दहशतवाद विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.

Narasihananda Saraswati, Jitendra Narayan, Sandeep Acharya
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ; ईडीने गुन्हा केला दाखल

जुनेद मोहम्मद सोशल मीडियावर सक्रिय होता. त्याने आत्तापर्यंत १७ हून अधिक फेसबुक अकाउंट तयार केले होते आणि त्याद्वारे तो इतरांशी संवाद साधायचा. जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली आणि उत्तरप्रदेशात घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याचे काही दिवसांपूर्वी निष्पन्न झाले होते.

काश्मीरमधील दहशतवादी संघटनेकडून जुनैदला दहशतवादी कारवायांसाठी पैसे पुरविण्यात आल्याचे या आधी झालेल्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुनेद मोहम्मद याला पुण्यातील दापोडी भागातून २४ मे रोजी ताब्यात घेण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com