Maharashtra Politics News:
Maharashtra Politics News: Saamtv

Loksabha Election: महायुतीत धुसफूस! 'आमच्या नादाला लागला तर...' भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याचा शिंदे गटाला इशारा

Maharashtra Politics News: अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच नाराजीनाट्य, वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच प्रकार माहिम विधानसभेतून समोर आला असून शिंदे- गट भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

सचिन गाड, मुंबई|ता. २४ एप्रिल २०२४

राज्यात सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभेसाठी ४०० पारचा नारा दिलेल्या भाजपने शिवसेना शिंदे गट तसेच राष्ट्रवादीला सोबत घेत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र अनेक ठिकाणी महायुतीमधील घटक पक्षांमध्येच नाराजीनाट्य, वादाची ठिणगी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. असाच प्रकार माहिम विधानसभेतून समोर आला असून शिंदे- गट भाजपमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकर यांची शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांवर फेसबुक पोस्टवरुन जोरदार निशाणा साधला आहे. प्रभादेवीत प्रचार रॅली दरम्यान शिंदे गटाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या वागणुकीवरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यावरुनच फेसबुक पोस्ट करत थेट निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.

हिंदुत्व आणि मोदींजींसाठी आम्ही काम करतो. बापाच्या दोन नंबरच्या पैश्यावर आणि पदावर आम्ही नाही उडत आणि युतीधर्म फक्त भाजप पाळणार असे अजिबात काही गैर समजात राहू नका. आमच्या नादी लागलात तर आरे ला कारे करायला आम्हाला चांगलाच जमतं, असे अक्षता तेंडुलकर यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maharashtra Politics News:
Supreme Court: दिव्यांग मुलांच्या मातांना बाल संगोपन रजा नाकारणे हे घटनात्मक कर्तव्यांचे उल्लंघन; सुप्रीम कोर्टाने फटकारले

दरम्यान, माहिम विधानसभा मतदार संघ हा दक्षिण मध्यमुंबई लोकसभेत येतो. याठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकीकडे राहुल शेवाळे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असतानाच भाजप- शिवसेना कार्यकर्त्यांमधील वादामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics News:
Hanuman Jayanti 2024 : अंजनीपुत्र हनुमान की जय..., शेकडाे भाविकांच्या घोषणांनी दुमदुमली अंजनेरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com