Mumbai News : बँक व्यवस्थापकानेच चोरले सोन्याचे दागिने, तीन कोटीचे दागिने पोलिसांकडून जप्त

Mumbai Crime News : स्टेट बँकेच्या लॉकरमधून सुमारे तीन कोटी रुपयांचे चार किलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली सेवा व्यवस्थापकाला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. मनोज म्हस्के असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून तो मुलुंड शाखेत कार्यरत आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Digital

Mumbai News

स्टेट बँकेच्या लॉकरमधून सुमारे तीन कोटी रुपयांचे चार किलो सोन्याचे दागिने चोरल्याच्या आरोपाखाली सेवा व्यवस्थापकाला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. मनोज म्हस्के असे आरोपी अधिकाऱ्याचे नाव असून तो मुलुंड शाखेत कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ फेब्रुवारी रोजी भांडुप पोलिस ठाण्यात बँकेचे अधिकारी अमित कुमार यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.

आरोपी मनोज म्हस्के बँकेच्या गोल्ड लोन विभागात कार्यरत आहे. तक्रारदार अधिकारी अमित कुमार यांना म्हस्के रजेवर असताना शाखेच्या सोन्याच्या लॉकरची जबाबदारी आणि ताबा देण्यात आला होता. तेव्हा अमित कुमार यांना यातील सोन्याच्या दागिन्यांची काही पॅकेट तेथे नसल्याचे लक्षात आले. तेव्हा कुमार यांनी ताबडतोब म्हस्के यांना फोन करून त्यांची तपासणी केली. तेव्हा म्हस्के याने ऑक्टोबर २०२३ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत ठेवलेले ‘सोने तात्पुरते काढून घेतल्याची’ कबुली दिली.

Mumbai News
Navi Mumbai News : पोलिसांची गाडी दिसताच ठोकली धूम; जीवाची बाजी लावत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

म्हस्के यांनी कुमार यांना आठवडाभरात सोने परत करण्याचे आश्वासन दिले. कुमार यांनी नंतर त्यांच्या वरिष्ठांना माहिती दिली. म्हस्के यांना शाखेत बोलावले असता त्यांनी हजर राहून काही वेळात सोने परत करण्याचे आश्वासन दिले; परंतु म्हस्के यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यानंतर अमित कुमार यांनी भांडुप पोलिसात जाऊन गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी म्हस्के याला अटक करून सोन्याचे दागिने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Mumbai News
Mumbai News : देशात पहिल्यांदा स्पायनल कॉर्ड स्टिम्युलेशन थेरपीचा वापर; रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने मिळणार वेदनांपासून आराम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com