Mumbai News : चहाच्या बहाण्याने दिलं गुंगीचं औषध...शारीरिक संबंध अन् १५ कोटींची खंडणी; अंधेरीतील हॉटेल मालकाला लुटणाऱ्या तरुणीला अटक

Mumbai Crime News : अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे 15 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी निकिता श्याम दाधीच ऊर्फ किमया कपूर या तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे.
Mumbai News
Mumbai News Saam Digital
Published On

Mumbai News

अंधेरीतील एका हॉटेल व्यावसायिकाकडे 15 कोटींची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी निकिता श्याम दाधीच ऊर्फ किमया कपूर या तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी तरुणीला न्यायलयाने सध्या पोलीस कोठडी सुनावली असून तिची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील तक्रारदार हॉटेल व्यावसायिक असून, त्यांच्याकडे निकिता नोकरीसाठी आली होती. याच दरम्यान तिने त्यांच्याशी जवळीक साधून त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला. जवळीक निर्माण करून तिने विविध कारण सांगून त्यांच्याकडून 15 लाख रुपये घेतले होते.

जानेवारी महिन्यांत तिने त्यांना चहाच्या बहाण्याने गुंगीचे औषध दिले होते. त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढून ती त्यांना ब्लॅकमेल करत होती. जर 15 कोटी रुपये दिले नाही तर पीडित तक्रारदाराची सोशल मिडीयासह कुटुंबीय, नातेवाईकांकडे व्हिडीओ पाठवून बदनामीची धमकी दिली होती. त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार करून त्यांना या गुन्ह्यांत अटक करू अशीही धमकी दिली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai News
Virar-Alibag Corridor : गुंठ्याला ५० लाखच हवे...अन्यथा जमिनीचा तुकडाही देणार नाही; विरार-अलिबाग कॉरीडॉर बाधित शेतकरी धडकले जिल्‍हाधिकारी कार्यालयावर

च्याकडून होणाऱ्या सततच्या ब्लॅकमेलिंगसह खंडणीच्या धमकीनंतर त्यांनी आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला होता. त्यांच्या तक्रार अर्जाची पोलिसाकडून शहानिशा करण्यात आली होती. त्यात निकिती ही त्यांना खंडणीसाठी ब्लॅकमेल करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी निकिताविरुद्ध गुन्हा नोंदवून तिला याच गुन्ह्यांत बुधवारी अटक केली.

Mumbai News
Virar Stray Dog : विरारमध्ये भटक्या कुत्र्यांचा वृद्धावर जिवघेणा हल्ला, वसई-विरारमध्ये दहशत

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com