Mumbai Kurla News: १४ वर्षीय मुलाला डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोची एकाच वेळी लागण; गुंतागुंत वाढल्याने मृत्यू

Boy tests Positive Malaria, Lepto & Dengue: मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू असताना या १४ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.
Mumbai Kurla News
Mumbai Kurla NewsSaam tv
Published On

Mumbai News: सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात अनेक शहरांमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. मात्र मुंबईमध्ये एका मुलाला डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोस्पायरोसिस अशा तीन आजारांनी एकाचवेळी ग्रासल्याचे दुर्मिळ प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.

Mumbai Kurla News
Ujani Dam Water Level : उजनीच्या पाण्यासाठी पुण्यातील सिंचन भवनासमोर शेतक-यांचा टाहाे

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या कुर्ल्यामधील (Kurla) एका १४ वर्षीय मुलाला एकाचवेळी ३ साथीच्या आजारांनी ग्रासल्याचे दुर्मिळ प्रकरण समोर आले. कुर्ला (पश्चिम) येथे राहणार्‍या या मुलाला सुरुवातीला ताप आणि कावीळ झाल्याने 14 ऑगस्ट रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते.

यावेळी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मलेरिया (Malaria) चाचणी आणि डेंग्यू (Dengue) NS1 चाचणी पॉझिटिव्ह आली. तसेच त्याची अधिकची चाचणी केली असता लेप्टोस्पायरोसिस (Lepto) झाल्याचेही निदान झाले, ज्यामुळे डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले. या मुलावर रुग्णालयात येण्यापुर्वी स्थानिक वैदूकडून उपचार घेतल्याचेही समोर आले.

Mumbai Kurla News
BJP on INDIA Meeting : 'इंडिया'ची बैठक म्हणजे गरुड झेप नाही तर श्वापदांची टोळी, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

हे तिनही आजार गंभीर असल्याने तसेच क्रिएटिनिनची पातळी वाढल्याने आणि मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने, त्याला मुंबई सेंट्रलच्या नायर रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. यावर बोलताना डॉक्टरांनी ३- ३ रोग झाल्याचे रुग्ण खूप कमी असतात असे सांगितले आहे. तसेच या मुलावर लवकर उपचार झाले असते तर त्याचा जीव वाचला असता.. असेही ते म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com