Mumbai News: मुंबईतील संग्रहालयांना बॉम्बस्फोटाची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

Mumbai Museums Receive Bomb Threat Emails: मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत.
Mumbai Museums Receive Bomb Threat Emails, Police On Alert Mode
Mumbai Museums Receive Bomb Threat Emails, Police On Alert ModeSaam Tv
Published On

Mumbai Museums Receive Bomb Threat Emails, Police On Alert Mode:

मुंबईतील नामांकित संग्रहालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकीचे ई-मेल प्राप्त झाले आहेत. वरळीचे नेहरू विज्ञान केंद्र, कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय इत्यादींसह अनेक प्रमुख संग्रहालयांना अज्ञात स्त्रोतांकडून बॉम्बस्फोटाचा इशारा देणारे धमकीचे ई-मेल प्राप्त झल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ई-मेल अज्ञात व्यक्तींनी शुक्रवारी सकाळपासून अनेक संग्रहालयांमध्ये केले होते. पहिला ईमेल CSMVS कडून कुलाबा येथे प्राप्त झाला आणि यानंतर इतरांनाही प्राप्त झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Museums Receive Bomb Threat Emails, Police On Alert Mode
Sharad Mohol: मोठी बातमी! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

संग्रहालयांच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिल्याने पोलिसांनी बॉम्ब निकामी पथकासह संग्रहालयाभोवतीच्या परिसरात तपास सुरू केला. मात्र अद्याप काहीही संशयास्पद आढळून आले नाही.  (Latest Marathi News)

पोलिसांनी ईमेल प्राप्त झालेल्या सर्व संग्रहालयांची तपासणी केली. शुक्रवारी रात्री कुलाबा पोलिसांनी बॉम्बस्फोटांबद्दल फसव्या ई-मेल पाठवल्याबद्दल अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Mumbai Museums Receive Bomb Threat Emails, Police On Alert Mode
Palghar Earthquake: पालघर भूकंपाने हादरलं, तीन दिवसात दुसरा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वी नववर्षाच्या पूर्वसंध्येला, पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा फोन आला होता. ज्याने शहरात बॉम्बस्फोटाचा इशारा दिला होता. मुंबई पोलिसांच्या हेल्पलाइन नंबरवर कॉल करणाऱ्या कॉलरने सांगितले की, नवीन वर्षात शहरात बॉम्बस्फोट होणार आहे आणि त्याने कॉल डिस्कनेक्ट केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com