राज्यभरात लम्पी आजाराचे थैमान; मुंबई महापालिका प्रशासनाने घेतली मोठी खबरदारी

मुंबई महापालिकेने मुंबईतील तबेले व गोशाळा येथे कीटक नियंत्रण उपाययोजनांसह सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.
Lumpy Skin Disease News
Lumpy Skin Disease News saam tv
Published On

Lumpy Skin Disease News : राज्यातील अनेक जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांवर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अतिवृष्टीच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरलेला नसतानाच लम्पी आजाराचे मोठे संकट त्याच्यावर ओढवलेलं आहे. लम्पी विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनेदेखील (BMC) खबरदारी घेतली आहे. यामुळे मुंबई महापालिकेने मुंबईतील तबेले व गोशाळा येथे कीटक नियंत्रण उपाययोजनांसह सर्वेक्षणास सुरुवात केली आहे.

Lumpy Skin Disease News
Weather Updates: मुंबईत येलो अलर्ट, तर राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता

प्रामुख्याने गोजातीय व म्हैस-वर्गीय जनावरांमध्ये लम्पी या विषाणूच्या प्रादुर्भावाची संभाव्यता लक्षात घेऊन राज्य शासनाने निर्गमित केलेल्या अधिसुचनेनुसार मुंबई महापालिका प्रशासनाद्वारे महानगरपालिका क्षेत्रात विविध स्तरिय उपाययोजना सातत्याने करण्यात येत आहेत. या उपाययोजना मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार पशुवैद्यकीय आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहेत.

सन २०१९ च्या पशुगणनेनुसार मुंबई क्षेत्रात ३ हजार २२६ गोजातीय जनावरे व २४ हजार ३८८ म्हैस-वर्गीय जनावरे आहेत. लम्पी साथरोगाच्या पार्श्वभूमीवर या जनावरांचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून, महानगरपालिकेच्या कीटक नियंत्रण खात्याद्वारे गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात योग्य त्या उपाययोजना करण्यास देखील प्रारंभ करण्यात आला आहे, अशी माहिती देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण यांनी दिली आहे.

Lumpy Skin Disease News
Lumpy Skin Disease: राज्यात २६६४ पशुंना लम्पीचा संसर्ग; पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार

ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव

ठाणे जिल्यात लम्पी या विषाणुजन्य आजाराने शिरकाव केला आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील गावांमध्ये जनावरांना लम्पी या विषाणुजन्य आजाराची लागण झाल्याची बाब आता समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून बाधित क्षेत्रातील दहा किलोमीटर परिघातील परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांचे लसीकरण देखील सुरू करण्यात आले असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com