मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांची केंद्रीय सचिवपदी बढती

चहल यांना केंद्रीय सचिवपदी बढती मिळाली असली, तरी केंद्रात जाणे किंवा न जाणे हे त्यांच्या हाती आहे.
Iqbal Singh Chahal
Iqbal Singh Chahal Saam Tv
Published On

मुंबई: मुंबई (Mumbai) महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांची केंद्रीय सचिवपदी बढती झाली आहे. चहल हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे अधिकारी मानले जातात. चहल यांना केंद्रीय सचिवपदी बढती मिळाली असली, तरी केंद्रात जाणे किंवा न जाणे हे त्यांच्या हाती आहे.

इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांची भारत सरकारच्या सचिव पदावर बढती झाली आहे. "आयएएस अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो, असं म्हटले जाते. चहल हे कोविड काळात प्रसिध्द झाले होते. त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. त्यांनी केलेल्या कामाची दखल डब्लूएचओने घेतली होती.

Iqbal Singh Chahal
संभाजीराजेंना उमेदवारी नाकारल्याचा छत्रपती घराण्याशी संबंध नाही: शाहू महाराज छत्रपती

देशातील ९ ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची भारत सरकारच्या सचिवपदी नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजीव जलोटा आणि विद्यमान महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या नावाचा समावेश आहे.

इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी कोरोना काळात मुंबईत चांगल्या पध्दतीने काम केले होते. मुंबईतील धारावी पॅटर्न जगभर प्रसिध्द झाला होता. या कामामुळे इक्बालसिंग चहल देशात प्रसिध्द झाले होते. त्यांच्या पुस्तकाचेही काही दिवसापूर्वी प्रकाशन झाले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांचे कौतुक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com