

Mumbai News: ऐन गर्दीच्या वेळी मुंबई मेट्रोच्या घाटकोपर ते वर्सोवा (ghatkopar to varsova metro) या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मेट्रोची वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली होती. पण दुरुस्तीनंतर आता मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. मेट्रो प्रशासनाकडून (Mumbai Metro Administration) ट्वीट करत ही माहिती देण्यात आली आहे.
एक तासांपूर्वी तांत्रिक बिघाडामुळे मेट्रोसेवा ठप्प झाली होती. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मेट्रो प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. पाऊण तासानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण होत मेट्रो सेवा पुन्हा सुरु झाली आहे. तसंच मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
मेट्रो प्रशासनाने ट्वीट करत असे सांगितले की, 'रेल्वे सेवा पुन्हा सुरू झाली आहे. वेळापत्रकानुसार मेट्रो सेवा नियमित करण्यात येत आहेत. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.' मेट्रो सेवा विस्कळीत झाल्यामुळे ऑफिस सुटायच्या वेळी प्रवाशांचे हाल होत आहे. सध्या मेट्रो उशिराने धावत आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
मेट्रोची सेवा ठप्प झाल्यानंतर प्रशासनानेच ट्वीट करत माहिती दिली होती. या ट्वीटमध्ये मेट्रो प्रशासनाने असे सांगितले होते की, 'तांत्रिक बिघाडामुळे सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे. लवकरात लवकर सेवा पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न सुरु आहे.' दरम्यान, पाऊण तासांच्या प्रयत्नानंतर दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो सेवा सुरु झाली आहे पण सुरळित होण्यास वेळ जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.