Viral Video : धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न, अवघ्या एका सेकंदाने वाचला प्रवाशाचा जीव; थरकाप उडवणारी घटना

Mumbai Local Train Viral Video : धावत्या रेल्वेत चढणे-उतरणे गुन्हा आहे. पायदानवर बसून प्रवास करू नका, असे रेल्वे प्रशासनार्फे वारंवार सांगितले जाते.
Mumbai Local Train Viral Video
Mumbai Local Train Viral VideoSaam TV
Published On

Mumbai Local Train Viral Video : धावत्या रेल्वेत चढणे-उतरणे गुन्हा आहे. पायदानवर बसून प्रवास करू नका, असे रेल्वे प्रशासनार्फे वारंवार सांगितले जाते. शिवाय पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृतीही केली जाते. मात्र, काही प्रवासी सर्रास नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे मग कधी जीव गमविण्याची वेळ येते. अशीच एक घटना वसई रेल्वे स्थानक परिसरात घडली. (Latest Marathi News)

Mumbai Local Train Viral Video
Akola Crime News : अंध पतीसमोरच नराधमाचा पत्नीवर अत्याचार; अकोल्यातील संतापजनक घटना

विरारला जाणारी लोकल रेल्वेस्थानकावर आली. यावेळी काही प्रवाशी पटाटपट लोकलमध्ये चढले. मात्र, गर्दी असल्याने एका ज्येष्ठ नागरिकाला पटकन लोकलमध्ये चढता आलं नाही. परिणामी लोकल निघताच हा व्यक्ती प्लॅटफॉर्मवरच कोसळला. ही बाब लक्षात घेता त्याठिकाणी गस्तीवर असलेल्या पोलिसाच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ धाव घेत या व्यक्तीला बाजूला खेचले.

दैव बलवंत्तर म्हणून या व्यक्तीचे प्राण वाचले. विजय वसंतराव मळेकर असं या ज्येष्ठ नागरिकाचे नाव असून आदिनाथ ठाणांबिर असं जीव वाचवणाऱ्या पोलिस शिपायाचं नाव आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकी भरली आहे.

नेमकं काय घडलं?

बुधवारी (५ एप्रिल) रात्रीच्या सुमारास ही थरारक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी वसई रोड रेल्वे स्टेशन परिसरात पोलिस शिपाई आदिनाथ ठाणांबिर हे प्लॅटफॉर्मवर गस्त घालत होते. रात्री 23:36 वाजता फलाट क्र 2A वर विरारला जाणारी लोकल ट्रेन आली. यावेळी नालासोपारा पूर्वेकडील बाबुल पाडा येथे राहणारे विजय वसंतराव मळेकर हे लोकलमध्ये चढत असताना अचानक त्यांचा तोल गेला.

त्याचवेळी लोकल प्लॅटफॉर्मवरून निघाली. सदरची घटना लक्षात येताच कर्तव्यावर असलेले पोलिस शिपाई आदिनाथ ठाणांबिर यांनी तात्काळ धावत जाऊन मळेकर यांना पकडून बाहेर खेचले. दैव बलवंतर म्हणून या नागरिकाचे प्राण वाचले. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला असून या धाडसी कृत्याबाबत वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन इंगवले यांनी पोलीस शिपाई आदिनाथ यांचा सत्कार केला. तसेच ज्येष्ठ नागरिक वसंतराव मळेकर यांना त्यांच्या घरी सुखरूप नेऊन पोहचवले.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com