Mumbai Local Train News: मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकल फलाटाला धडकली; काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Mumbai Local Train Accident News: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून टिटवाळा जाणारी लोकल ट्रेन मुंब्रा स्थानकातील फलाटाला धडकल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
Mumbai Local Train Accident News
Mumbai Local Train Accident NewsSaam TV

Mumbai Local Train Accident News: मुंबईच्या मुंब्रा स्थानकातून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून टिटवाळा जाणारी लोकल ट्रेन मुंब्रा स्थानकातील फलाटाला धडकल्याची घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मोटरमनने तातडीने ब्रेक दाबल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

या घटनेमुळे लोकलमधून (Mumbai Local Train) प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकारामुळे २५ मिनिटे धीम्या मार्गावरील एक मार्गिका बंद करण्यात आली होती. दरम्यान, लोकल रवाना केल्यानंतर बुधवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Mumbai Local Train Accident News
Maharashtra Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; या जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंब्रा स्थानकात लोकल फलाटाला धडकली, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (CSMT To Titwala) टिटवाळ्याला निघालेली लोकल सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुंब्रा स्थानकात पोहोचली. फलाटावर प्रवेश करताच लोकलचा पहिला डबा फलाटाला धडकला.

ही बाब लक्षात येताच मोटारमनने तातडीने लोकल थांबवली. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. घटनेनंतर मुंब्रा स्थानकातून लोकल रिकामी रवाना झाल्याने त्यामागून धावणाऱ्या कल्याण एसी लोकलमध्ये प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एसी लोकलमध्ये प्रचंड गर्दी झाली.

मुंब्रा स्थानकात २५ मिनिटे लोकल खोळंबल्याने त्यामागे धावणाऱ्या कल्याण, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली लोकल रखडल्या होत्या. दरम्यान, लोकल घसरल्याने हा प्रकार झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. मात्र, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

'मुंब्रा स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक १- सीएसएमटी ते टिटवाळा स्लो लोकल-प्लॅटफॉर्मच्या साईडला रेल्वेचा रेल्वेचा डबा घासल्यामुळे कर्मचार्‍यांनी रेल्वेची तपासणी केली. यात सगळं सामान्य आढळलं', असं ट्विट मध्य रेल्वेने केलं आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com