Mumbai News: विघ्नहर्त्याची मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसमोर विघ्न? परवानगी असतानाही गणेशमूर्ती कारखान्यांवर कारवाई

Ganpati Festival 2023: विघ्नहर्त्याची मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसमोर विघ्न? परवानगी असतानाही गणेशमूर्ती कारखान्यांवर कारवाई
Mumbai Goregaon News
Mumbai Goregaon NewsSaam Tv

>> संजय गडदे

Mumbai Goregaon News: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबईतील गोरेगाव पूर्वेकडे आरे कॉलनीत मूर्ती बनवून विकणाऱ्या कारागिरांवर संकट ओढवले आहे. मागील बारा ते पंधरा वर्षापासून अधिकृत परवानगी घेऊन गणेश मूर्ती बनवण्यासाठी मंडप उभारणाऱ्या मूर्तिकारांवर आरे प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

त्यामुळे विघ्नहर्त्याची मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांसमोर नवीनच विघ्न समोर उभे राहिले आहे. यामुळे या सर्व मूर्तिकारांनी स्थानिक आमदार रवींद्र वायकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली आहे. शिवाय राज्याचे वन आणि महसूल सचिव आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना देखील मदत करण्यासाठी साकडे घातले आहे.

Mumbai Goregaon News
BJP to Protest: फडणवीसांवरील टीकेनं भाजप कार्यकर्ते भडकले, कार्यालयाबाहेरच 'सामना'ची केली होळी

गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीतील पाच नंबर आणि सहा नंबर पाडा परिसरात मागील बारा ते पंधरा वर्षापासून अनेक मूर्तिकार गणपती सणापूर्वी आरे प्रशासन आणि वन व महसूल खात्याच्या सर्व परवानगी घेऊन अधिकृतपणे तात्पुरते मंडप उभारतात. (Latest Marathi News)

यासाठी आवश्यक असलेली फी देखील शासनाला देत असतात यावर्षी देखील या गणपती मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांनी रीतसर परवानगी घेऊन आवश्यक ती फी शासनाला भरून मंडप उभारले आहेत. मात्र आता अचानकपणे आरे प्रशासनाने मंडप काढण्यासंदर्भात नोटीस पाठवली व प्रत्यक्षात कारवाईला देखील सुरुवात केली आहे.

Mumbai Goregaon News
Mahadev Jankar On BJP: 'काँग्रेस गद्दार तर भाजप हा महागद्दार, सत्तेची घमेंड BJP च्या डोक्यात गेलीय', महादेव जानकर यांची जोरदार टीका

यामुळे या विघ्नहर्ताची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारागिरांवरच एक नवीन विघ्न ओढवले आहे. लाखोंचा माल मूर्ती बनवण्यासाठी आणला असून आता पावसाला देखील सुरुवात होत आहे त्यामुळे हा माल नेमका ठेवायचा कुठे असा प्रश्न देखील या मूर्तिकारांना पडला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com