Mumbai Fire News : मुंबईतील आगीच्या घटनांवरून न्यायमूर्तींच्या संतापाचा भडका; राज्य सरकारला दिले २४ तास

Mumbai News Update : सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. आभा सिंह यांच्या युक्तिवादावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सवाल विचारला आहे.
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsSaam TV
Published On

सचिन गाड

High Court on Mumbai Fire :

मागील काही दिवसांत मुंबईत अनेक आगीच्या घटना समोर आल्या आहेत. उंच इमारतींमध्ये आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यानंतर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. यावरुन मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशांनी राज्य सरकारला झापलं आहे.

उंच इमारतीतील अग्निसुरक्षेबाबत राज्य सरकार अजूनही उदासीन आहे. मुंबईत उंच इमारतीत लागणाऱ्या आगीत लोकांचे जीव जाणं अद्यापही सुरूच असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्यावरच करणार का? असा सवाल उच्च न्यायालयाने सरकारला विचारला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Fire News
Hiwali Adhiveshan 2023 : हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपुरात; शिवसेना ठाकरे-शिंदे गटात जुंपणार, केंद्रस्थानी मुंबई महापालिका

मुख्य न्यायाधीशांनी अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांसाठी राज्य सरकारला 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. फेब्रुवारीमध्ये एक्सपर्ट कमिटीचा अहवाल येऊनही अद्याप सरकारच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. सरकारकडून यासाठी टाळाटाळ करत असल्याचं दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Mumbai Fire News
Governor Ramesh Bais on School Time : राज्यातील शाळांच्या वेळा बदलणार? राज्यपाल यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

त्यामुळे चार सदस्यीय समितीच्या अहवालावर शुक्रवारपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या आभा सिंह यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे. आभा सिंह यांच्या युक्तिवादावर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सवाल विचारला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com