Mumbai Fire News: इमारतीला लागली भीषण आग, सात वर्षाच्या चिमुकलीच्या सतर्कतेमुळे टळली मोठी हानी

Mumbai News: सात वर्षाच्या चिमुकलीच्या सतर्कतेमुळे टळली मोठी हानी
Mumbai Fire News
Mumbai Fire NewsSaam Tv
Published On

Mumbai Fire News: मुंबईमधील मालाड (पश्चिम) येथे रविवारी भीषण आग लागली होती. मात्र एका सात वर्षीय मुलीच्या सतर्कतेमुळे अनेक नागरिकांचे प्राण वाचले आहे.

पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी साडेचारच्‍या सुमारास 'पंचरत्‍न अपार्टमेंट' या चोवीस मजलीय इमारतीच्‍या 23 व्‍या मजल्‍यावर एका इमारतीला अचानक आग लागली. इमारतीमधील लहान मुले आगपेट्यांशी खेळत असताना बिछान्‍याने आणि पदड्यांनी पेट घेतला. वातानुकुलिक यंत्रणा, छताच्‍या प्‍लास्‍टर ऑफ पॅरिस (पीओपी) आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी पडले. खेळत्‍या हवेमुळे सदनिकेतील ज्‍वलनशील साहित्‍याने पेट घ्‍यायला सुरूवात केली.

Mumbai Fire News
Threat to Social Worker Anna Hazare | Anna Hazare यांना जीवे मारण्याची धमकी

आग लागताच इमारतीतील धोक्‍याची घंटा देणारा 'फायर अलार्म' वाजू लागला. फायर अलार्म ऐकू येताच याच इमारतीच्‍या चौथ्‍या मजल्‍यावर राहणाऱ्या मुग्‍धा मयेकर या पहिलीत शिकणा-या अवघ्या 7 वर्षाच्या चिमुरडीने तातडीने आईकडे धाव घेतली. इमारतीत काहीतरी दुर्घटना घडल्‍याचे आईला सांगितले. (Latest Marathi News)

त्यानंतर मुग्धाच्या आईने खातरजमा केली असता 23 व्‍या मजल्‍यावरील सदनिकेला आग लागल्‍याचे त्यांना दिसले. त्यानंतर त्यांनी सर्वप्रथम अग्निशमन दल नियंत्रण कक्षास दूरध्वनीवर घटना कळविली. मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या आपत्‍कालीन मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधत घटनेची माहिती दिली. आपत्ती व्‍यवस्‍थापन नियंत्रण कक्षाने तात्‍काळ सदर घटना संबंधित मदतसेवांना कळवून घटनास्‍थळी आवश्‍यक मदतकार्य कमीत कमी वेळात उपलब्‍ध करुन दिले.

Mumbai Fire News
Nagpur Crime News: 'मुलीची हत्या करण्यासाठी जातोय, थांबू शकत असाल तर थांबवा', माथेफिरू प्रेमीच थेट पोलिसांना आव्हान

दरम्यानच्या काळात मीनल यांनी आपल्‍या घराचा विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा तातडीने बंद केला. आजुबाजूच्‍या घरातील नागरिकांना आगीची दुर्घटना लक्षात आणून देत त्‍यांनाही विद्युत पुरवठा, गॅस पाईपलाईन पुरवठा बंद करण्‍यास सांगितले. त्यानंतर आपल्या दोन मुलींसह आणि शेजाऱ्यांना घेऊन त्या पायऱ्यांनी इमारतीतून खाली उतरल्या. त्याचबरोबर त्यांनी इमारतीतील इतर नागरिकांना पायरीचा वापर करण्याचे आणि लिफ्टचा वापर न करण्याचेही सांगितले. दरम्यान, अग्निशमन दलाने अवघ्या अर्धा तासात आग आटोक्यात आणली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com