Mumbai Lilavati Hospital: लीलावती हॉस्पिटलच्या आवारात काळी जादू अन् १५०० कोटींचा घोटाळा, तीन गुन्हे दाखल

Mumbai Lilavati Hospital: लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांनी १५०० कोटींहून अधिक रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा आरोप केला होता.
Mumbai Lilavati Hospital
Mumbai Lilavati Hospital
Published On

मुंबईतील प्रसिद्ध लीलावती हॉस्पिटलमध्ये १५०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालाय. हॉस्पिटल चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांची अनियमितता केल्याचा आरोप केलाय. लीलावती कीर्तिलाल मेहता मेडिकल ट्रस्टने या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय आणि वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र तक्रारी केल्यात. माजी विश्वस्त आणि त्यांच्या साथीदारांकडून रुग्णालयाच्या आवारात काळी जादू केली जात असल्याचा दावाही करण्यात आलाय.

करण्यात आलेल्या आरोपानुसार लीलावती रुग्णालयाच्या आर्थिक नोंदींच्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये आर्थिक गैरव्यवहार झालाय. यात ट्रस्टच्या प्रशासनावर आणि या प्रमुख खासगी रुग्णालयाच्या आरोग्य सेवांवर परिणाम झालाय. रुग्णालयाचे विश्वस्त प्रशांत मेहता म्हणाले, “आम्ही दाखल केलेल्या तक्रारींचे वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर एफआयआर दाखल करण्यात आलाय. माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध तीनहून अधिक एफआयआर नोंदवण्यात आलाय.

आता चौथी तक्रारही न्यायालयात प्रलंबित असून ही एफआयआर वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलीय. हा एफआयआयर काळी जादू आणि तंत्र-मंत्र केल्याप्रकणी दाखल करण्यात आलीय. वांद्रे येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपींविरोधात तपास करण्याचे आदेश दिले आहेत.लीलावती किर्तिवाल मेहता मेडिकल ट्रस्टची प्रतिमा पारदर्शकताला टिकवून ठेवणं हे प्रमुख प्राधान्य असेल , असं मेहता म्हणालेत.

जेणेकरून गरजू रुग्णांना रुग्णालयातील सेवांचा योग्य वापर करता येईल. “फॉरेन्सिक ऑडिटमध्ये उघडकीस आलेली अनियमितता हे फक्त ट्रस्टचा विश्वासघातच नाही तर रुग्णालयाच्या मूलभूत कामकाजाला धोका देणारं आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांना शिक्षा देऊ. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (PMLA) अंतर्गत या आर्थिक गुन्ह्यांचा तात्काळ आणि प्रभावीपणे तपास अंमलबजावणी संचालनालयाने करावे असे आवाहनही मेहता यांनी केले.

प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर ट्रस्टने ताबा मिळवला तेव्हा सध्याच्या ट्रस्टींना हॉस्पिटलच्या आर्थिक व्यवहारात मोठी अनियमितता आढळून आली. त्यानंतर फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेतलाय. चेतन दलाल इन्व्हेस्टिगेशन अँड मॅनेजमेंट सर्व्हिसेस आणि ADB आणि असोसिएट्स यांची ऑडिटसाठी नियुक्ती करण्यात आली होती. ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी मोठ्या प्रमाणात घोटाळा, आर्थिक हेराफेरी केल्याचे लेखापरीक्षण अहवालात उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com