Drugs Case: ...अशी टाकली NCB ने क्रूझ पार्टी वर रेड !

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे.
Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरु
Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरुSaam TV
Published On

मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Aryan Khan) मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. आता आर्यन खान सह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूनमून धमेचा, नुपूर सारिका, यास्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट या आठ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याची एनसीबी टीमकडून चौकशी केली जात होती. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यनच्या चौकशीला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले आहे की ज्या लोकांची चौकशी केली जात आहे. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यनचा समावेश आहे.

Drug Case: शाहरुखचा मुलगा आर्यनला एनसीबीनं घेतलं ताब्यात; चौकशी सुरु
रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवार

अशी केली कारवाई

- या ड्रग्ज पार्टीसाठी ८० हजार ते ५ लाख तिकिट आकारण्यात आलं होती.

- 2 हजार जणांची क्षमता असताना क्रूझवर फक्त १ हजारहून अधिक जणांना प्रवेश देण्यात आला.

- इनस्टाग्रामहून या ड्रग्ज पार्टीचं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं.

- पार्टीतील बहुतांश तरूण हे दिल्लीचे असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

- एनसीबीने कारवाईला सुरूवात करताच अरबाजने बुटात ड्रग्ज लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याची अंग झडती घेतली असता ही बाब पुढे आली.

- ताब्यात घेण्यात आलेला महिलेच्या पर्सच्या हँडलमधील पोकळ जागेतूनहे ड्रग्ज पार्टीत सुरक्षा रक्षषाची नजर चुकवत आणण्यात आलं.

- एका तस्कराच्या काँलरच्या आणि पुरषांच्या पँन्टचे कंबर पट्टे आणि अंडरवेअरच्या शिलाईतून हे ड्रग्ज क्रूझवर आणण्यात आले.

- 2 ऑक्टोंबर सकाळी 11 वा. NCB चे अधिकारी साध्या वेशात दाखल झाले होते.

- दुपारी 2 च्या सुमारास क्रूझने बंदर सोडल्यानंतर पार्टीला सुरूवात झाली.

- दीडच्या सुमारास पार्टी ऐन रंगात असताना NCB च्या अधिकाऱ्यांनी आपली ओळख सांगत कारवाईला सुरूवात केली.

- दुपारी 4 च्या सुमारास NCB अधिकाऱ्यांना काही जणांकडे चरस, कोकेन, एमडी ड्ग्ज मिळून आले.

- सायंकाळी 4 च्या सुमारास क्रूझचा प्रवास थांबवून 6 च्या सुमारास क्रूझ पून्हा बंदरावर आणण्यात आली.

- ड्रग्ज आणि संशियत आरोपींचे पंचनामे क्रूझवर केले आणि संशयितांना कायदेशी प्रक्रिया करून 11 च्या सुमारास पून्हा 4 जणांना घेऊन NCB अधिकारी कार्यालयात आले.

- त्यानंतर मध्य रात्री 1:30 च्या सुमारास NCB अधिकारी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह 9 जणांना घेऊन NCB कार्यालयात आले.

- यातील 8 जणांचा गुन्ह्यातील सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिर 3 च्या सुमारास गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू केली.

- तर मध्यरात्री सहभाग नसलेल्या 5 जणांना NCB अधिकाऱ्यांनी सोडलं.

- सकाळी 10 च्या सुमारास 8 आरोपी मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाझ मर्चंट यांच्यावर अधिकृत गुन्हा दाखल केल्याचं जाहिर केलं.

- दुपारी 2 वा. ज्या क्रूझवर ही पार्टी सुरू होती त्या कार्डिलिया क्रूझ कडून घटनचा निषेध करत. तपासाला पूर्ण सहकार्य करण्याचं अधिकृत माहिती देण्यात आली.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com