रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवार

राज्य सरकार म्हणून रिझर्व बँकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असं मी राज्य सरकारला बोललो असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवार
रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवारSaam TV

पुणे: लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह (Sakal Maha Conclave) नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेला देशाचे माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची उपस्थिती होती. त्यात बोलताना शरद पवार यांनी रिझर्व बँकेच्या (Reserve Bank) कारभाराविषयी खंत व्यक्त केली आहे. रिझर्व बँकेचे दोन भाग झाले तर संचालक मंडळाचे दोन भाग होतील सर्व अधिकार रिझर्व बँकेला गेले तर संचालक मंडळाने काय करायचं असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. रिझर्व बँकेने सहकार बँकांना परवाने दिले नाहीत, त्याचबरोबर सहकार क्षेत्रात काही लोक सत्तेचा गैरवापर करतात असा लोकांमध्ये समज आहे. रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं. तसेच राज्य सरकार म्हणून रिझर्व बँकेच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाऊ असं मी राज्य सरकारला बोललो असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.

रिझर्व बँक ऐकत नसेल तर सहकारी बँकांनी कोर्टामध्ये जावं- शरद पवार
Sakal Maha Conclave: सामान्य लोकांना सहकार क्षेत्राबाबत अनेक गैरसमज- शरद पवार

अमित शहांचं सहकारी बँकां संदर्भात धोरण अनुकूल राहील असं मला वाटतं ते अहमदाबाद सहकारी बँकेचे संचालक होते. आमच्यासारखे लोक अमित शहा यांच्या पाठीशी उभे राहतील त्यामुळे सहकाऱ्याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र, गुजरात या राज्यात सहकाराचं मोठं काम आहे, त्याचबरोबर सहकार संस्था उभारण्यासाठी अनेकांनी आपली हयात घातली आहे. सहकार क्षेत्रात सध्या खूप अस्वस्थता वाढली आहे. संस्थांना बलवान करण्यासाठी मोठ्या सुधारणा करण्याची काळाची गरज असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. सामान्य लोकांनाही सहकार क्षेत्राबाबत अनेक गैरसमज आहेत. अनुभवी लोकांना संस्थेतून बाहेर काढणं हे दुर्दैव असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

अनुभवी सहकार चळवळ संपवणे हे संस्थेसाठी धोकादायक आहे. पहिला साखर कारखाना काढणाऱ्या विखे पाटलांचं शिक्षण जास्ती नव्हतं, ज्यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ उभी केली असे वसंतदादा पाटील त्यांचं शिक्षणही कमीच होतं मात्र सहकार चळवळ उभी राहिलीच त्यामुळं शिक्षण ही अट नसली तरी सहकार उभं राहू शकतं असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com