Mumbai Dam Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! शहराला पाणी पुरवठा करणारी ३ धरणं पूर्णक्षमतेने भरली

Mumbai Dam Water Level Update : मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर चार जलाशय कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे.
Mumbai Dam Water Level
Mumbai Dam Water LevelSaam Digital
Published On

गेले दोन दिवस पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला आहे. किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबई परिसरातही कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांपैकी ३ जलाशय पूर्ण क्षमतेने भरली आहेत. तर चार जलाशय कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे. मुंबईकरांसाठीही आनंदाची बामती आहे कारण पुढच्या वर्षभरतरी मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

Mumbai Dam Water Level
IMD Red Alert : पुणे शहर आणि जिल्ह्याला रेड अलर्ट, खडकवासलातून २३००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

शेवटीची आकडेवारी हाती आली तेव्हा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ जलाशयांमध्ये एकूण ९५.२७ टक्के पाणी साठा आहे. अप्पर वैतरणा धरणात ९४.२७ टक्के, मोडक सागरमध्ये १०० टक्के, तानसा - ९८.५३ टक्क, मध्य वैतरणा - ९७.६१ टक्के, भातसा - ९३.२३ टक्के, विहार - १०० टक्के तर तुलसी जलायशात ९७.७१ पाणीसाठा आहे. मोडकसागर, विहार ही धरण पूर्णक्षमतेने भरली आहेत, तर तानसा धरण कोणत्याहीक्षणी भरण्याची शक्यता आहे.

गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागल्यानंतर त्यापाठोपाठ 'हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय' देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ३ तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईला पाणीपुरवठा करणारा आणखी एक तलाव, मध्य वैतरणा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे विहार आणि मोडक सागर तलावात मोठ्या प्रमाण पाणीसाठा जमा होत आहे. 24 जुलै रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास तानसा तलाव ओव्हरफ्लो झाला, त्यामुळे सातही जलाशयांमध्ये एकाच दिवसात 17 दिवसांनी पाणीसाठा वाढला आहे. ठाण्यातील शाहपूर भागात असलेल्या तानसा तलावातून मुंबईला अंदाजे 400 मिलियन गॅलन पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान आज दिवसभर मुंबई परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इतर चार धरणंही पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

Mumbai Dam Water Level
Maharashtra Rain Update: पुणे,नाशिकसह अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस; गोदावरी नदीला पूर, जाणून घ्या राज्यातील स्थिती

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com