Mumbai Crime: ऑन ड्यूटी पोलीसाला धमकी! शिवीगाळ करत कानशिलात लगावली; मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai News: आरोपीला चौकशी कामी बोलवण्यासाठी गेलेल्या ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवा म्हाडा कॉलनीत घडला आहे.
On duty police Threatened and assaulted
On duty police Threatened and assaultedsaam tv

>>संजय गडदे

Mumbai Police : मारहाणीच्या गुन्ह्यातील आरोपीला चौकशीसाठी बोलवण्यास गेलेल्या ऑन ड्युटी पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार वर्सोवा म्हाडा कॉलनीत घडला आहे. अंधेरी पश्चिमेकडील वर्सोवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महाडा कॉलनीत शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देत, शिवीगाळ करून कानशिलात लगावल्याने आरोपीविरोधात गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. लालजी रनिंगभाई वाघ (४० वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

On duty police Threatened and assaulted
Crime News In Mumbai : आयुष्य उद्ध्वस्त झालं...; झटपट पैसे कमवण्यासाठी तरुणाने केलं हे भयानक कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिमेकडील चार बंगला म्हाडा परिसरात फिल्म प्रमोशनचे काम करणाऱ्या अर्पित गर्गे यांच्या ऑफिस मधील ऑफिस बॉय सियाराम मंडल याला लालजी वाघ याने त्याच्या ऑफिसमध्ये घुसून शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देखील दिली. या विरोधात अर्पित गर्गे यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीनुसार वर्सोवा पोलीस ठाण्यातील निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षक यांनी लालजी वाघ याला चौकशीसाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात बोलावले आहे असे सांगितले. त्यावेळी लालजी वाघ याने ऑन ड्युटी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देत शिवीगाळ करून कानशिलात मारल्याची घटना घडली शनिवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. (Mumbai Crime)

On duty police Threatened and assaulted
Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात पोलीस स्टेशमध्ये बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी; पंतप्रधानांनी व्यक्त केलं दु:ख

यावेळी त्याला तिथे उपस्थित इतर पोलीस कर्मचाऱ्याने अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.

घडलेला प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर निर्भया पथकातील पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून लालजी वाघविरुद्ध पोलिसांनी पोलीस अधिकार्याला मारहाण करून शिवीगाळ करून धमकी देणे, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून रविवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com