Mumbai Crime News: औषधांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, ३ कोटींची औषधं जप्त

Mumbai Crime News: भारतातून ऑस्ट्रेलियात प्रतिबंधित औषधाची तस्करी करणाऱ्या टोळीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून तीन कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त केली आहेत.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Digital
Published On

Mumbai Crime News

भारतातून ऑस्ट्रेलियात प्रतिबंधित औषधाची तस्करी करणाऱ्या टोळीचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून तीन कोटी रुपयांची प्रतिबंधित औषधे जप्त केली आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टिल टेबलच्या आत लपवून ही तस्करी सरू होती. व्ही. सिंग, जी. शर्मा आणि पी. शर्मा अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

9.877 किलो अॅम्फेटामाईन (Amphetamine), झोलपिडेम टार्टरेट 2.548 kgs (9800 tabs) Zolpidem Tarterate आणि ६.५३५ किलो ट्रामाडॉलच्या 18700 टॅब्लेट असा एकून तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जवळपास २-३ या तिघांची टोळी औषधाची तस्करी करत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Crime News
Pune Crime News: पुणे हादरलं! अल्पवयीन कर्णबधीर मुलीवर तिचा भाऊ आणि मित्रांकडून वारंवार अत्याचार

'ससून'मधून धक्कादायक प्रकार उघडकीस

पुण्यातील ससून रुग्णालयातून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रुग्णालयातील महत्त्वाचे शिक्के चोरीला गेल्यामुळे खळबळ माजली आहे. आरोपींनी शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केल्याची माहिती उघड झाली असून या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रकाश पांडुरंग मोंडकर आणि सत्पाल पवार या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोघांनी १४ डिसेंबर रोजी ससूनमधील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची नजर चुकवून शिक्के चोरी केले होते. त्याआधारे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार केले. ही बाब समोर आल्यानंतर डॉ. दामशेट्टी यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नेमके हे बनावट प्रमाणपत्र या आरोपींनी कोणाला वाटली आहेत आणि त्यातून किती रक्कम कमावली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Mumbai Crime News
Satara Crime News: दुकान बंद करून माय-लेकी घरात झोपी गेल्या; सकाळी शेजाऱ्यांनी दरवाजा उघडताच दृश्य बघून हातपाय लटपटले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com