Mumbai Crime News: जिम ट्रेनरवर चाकूने प्राणघातक हल्ला; घटनेमागचं कारण ऐकून तुमचाही होईल संताप

Attack On Gym Trainer: जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद नायाफ इम्तियाज बलोचसोबत याच जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या मेहबूब मुस्ताक अहमद खान याच्याशी मैत्री झाली.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News:

मुंबईमध्ये एका जिम ट्रेनरवर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिम ट्रेनर मोहम्मद नायाफ इम्तियाज बलोच (२६ वर्षे) याने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Mumbai Crime News
Latur Crime: चोरट्यांच भलतं धाडस! उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीसांसह ६ अधिकाऱ्यांची घरे फोडली; लातुरात खळबळ

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपी आपल्या मूळ गावी पळून गेला असल्याची माहिती मिळाली पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा करून ओशिवरा पोलिसांच्या तपास पथकाने आरोपीला उत्तर प्रदेश गोंडा येथून अटक केली आहे. आरोपीला अंधेरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जिममध्ये झाली मैत्री

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, लोखंडवाला ओशिवरा भागातील प्लॅनेट फिटनेस जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या मोहम्मद नायाफ इम्तियाज बलोचसोबत याच जिममध्ये व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या मेहबूब मुस्ताक अहमद खान याच्याशी मैत्री झाली.

घड्याळाची आदला बदली

या दोघांनीही त्यांच्याकडे असलेली घड्याळे आपापसात बदलून घेतली होती. परंतू मेहबूब यास जिम ट्रेनर मोहम्मद याने दिलेले घड्याळ आवडले नसल्याने मेहबूबने आपले घड्याळ पुन्हा मागितले. जिम ट्रेनर मोहम्मदने ते घड्याळ परत दिले नाही.

घड्याळ नाही तर पैसे दे

सहा डिसेंबर रोजी मेहबूब पुन्हा जिममध्ये गेला व घड्याळ देणार नसेल तर घड्याळाचे पैसे दे अशी मागणी करू लागला. यावर माझ्याकडे पैसेही नाहीत आणि तुला द्यायला घड्याळ देखील नाही असं जिम ट्रेनर म्हणाला. हे ऐकून मेहबूबला राग अनावर झाला व त्याने त्याच्यासोबत आणलेल्या धारदार चाकूने जिम ट्रेनर मोहम्मदच्या छातीवर आणि गालावर तसेच बरगड्यांवर गंभीर हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

या संदर्भात मोहम्मदने ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये हल्लेखोर तरुणाविरोधात तक्रार दिल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी धारदार शस्त्राने जिम ट्रेनरवर हल्ला करत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक त्याच्या घरी गेले असता आरोपी तेथूनही फरार झाला.

यानंतर ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन पाटील, पोलीस निरीक्षक विजय माडये (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील,सफौ सुनील खैरे,पो.भंडारे, पो.शि.चव्हाण असे पथक आरोपीला पकडण्यासाठी उत्तर प्रदेश गोंडा जिल्ह्यातील कस्टुवा, खीरई खिरवा येथे पाठवण्यात आले.

मात्र पोलीस पकडण्यासाठी आल्याची माहिती आरोपीला मिळाल्यानंतर त्याने तेथूनही पळ काढला. पोलिसांनी घरातील सर्व नातेवाईकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कसून चौकशी केली मात्र उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांनी एका सहा वर्षाच्या मुलाला आरोपीचा फोटो दाखवतात त्या लहान मुलाने हे आमचे अंकल असून ते आत्ताच घरातून बाहेर गेले असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीला सापळा रचून अटक करून मुंबईत आणले व न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Crime News
Nashik Crime News: नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; सोलापूर ड्रग्ज कारखान्यातून फरार तस्कराच्या आवळल्या मुसक्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com