Mumbai Crime News : मुंबई हादरली! पाणी भरण्यासाठी उठलेल्या पत्नीवर पतीचा अॅसिड हल्ला

मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मुंबईत पतीनेच पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Mumbai Police Crime News
Mumbai Police Crime NewsSaam TV

Mumbai Crime News : मुंबईतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. मुंबईत पतीनेच पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मुंबईच्या लोकमान्य टिळक नगर परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Police Crime News
Mumbai Crime News : शिकवणीला गेलेल्या मुलीवर अत्याचार, धक्कादायक घटनेने मुंबई हादरली

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) पतीनेच पत्नीवर अॅसिड हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या लोकमान्य टिळक नगर परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेस तात्काळ संदेश भाटीया रुग्णालयात दाखल केली आहे. या प्रकरणी महेश पुजारी या ६२ वर्षीय व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी लोकमान्य टिळक रुग्णालयात पोलिसांनी आरोपी विरोधात ३२६(अ), ३०७, ५०४,५०६ भा.द.वी. कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील अॅसिड हल्ला प्रकरणातील पीडित महिला १३ जानेवारी रोजी सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी पाणी भरण्याकरिता उठल्या होत्या. त्यावेळी मानलेला पती ६२ वर्षीय महेश विश्वनात पुजारी त्यांच्या घरासमोर आला. महेश याने पूर्वीच्या वादावरून शिवीगाळ करत त्यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पीडित महिलेवर अंगावर अॅसिड हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्याचबरोबर गुन्ह्याचे तपासाकरिता वेगवेगळे पोलीस पथक तयार केले आहे.

याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त, पायधुनी विभाग, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांनी पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने आरोपीतास तात्काळ अटक केलेली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com