मुंबई - मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) 'डी कंपनी'शी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा जवळचा गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटी या सलीम फ्रूटला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest Mumbai News In Marathi)
गेल्या काही दिवसांपासून दाऊद टोळीतील मुंबईतले सक्रिय सदस्य मुंबई पोलिसांच्या रडारवर होते. अजय गोसारिया, फीरोज चमडा, समीर खान,अमजद रेडकर आणि यासह आणखी एका आणखी दाऊद टोळी संबांधित व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी गँगस्टर छोटा शकीलच्या भावाला अटक केली होती. सलीम फ्रूट आणि दाऊदचा जवळचा सहकारी रियाझ भाटी मोक्का कारवाई केल्यानंतर डी गॅंग सदस्य पोलिसांच्या रडारवर होते. या दोघांचे जबाब नोंदवल्यानंतर या टोळीतील आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या पाचही जणांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून तेथे त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळणारे डी कंपनी संबंधित आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.