Congress Office Protest : मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं,VIDEO

BJP vs Congress : मुंबईत राजयकीय कार्यकर्त्यांचा मोठा राडा झाला आहे. भाजप कार्यकर्त्याने काँग्रेसचं मुंबईतील कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. यावेळी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.
मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं
mumbai politics Saam tv
Published On

मुंबई : मुंबईच्या काँग्रेस कार्यालयासमोर मोठा राडा झाल्याची घटना घडली आहे. मुंबईत काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडल्याची घटना घडली आहे. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला. त्यानंतर परिसरात तणावाचं वातावरण पाहायला मिळालं.

मिळालेल्या माहितीनुसार, संसदेतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्याचे पडसाद देशभर उमटताना दिसत आहे. एकीकडे भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याचा आरोप भाजपने केला आहे. दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप केले जात आहेत. याचदरम्यान, मुंबईत भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर आंदोलन केलं.

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं
Maharashtra Politics: नाराज छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? कार्यकर्त्यांचा भाजपात जाण्याचा आग्रह

भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. भाजप कार्यकर्त्यांनी थेट सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या पोस्टरवर शाईफेक केली. तसेच काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांच्या पोस्टरवरही शाईफेक केली. तसेच भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं कार्यालय फोडलं. भाजप कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्यानंतर परिसरात एकच तणाव पाहायला मिळाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करावा लागला.

मुंबईत भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसचं कार्यालय फोडलं
Prakash Ambedkar : अमित शाह यांच्या विधानावर प्रकाश आंबेडकर यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले... |Marathi News

या घटनेवर विजय वडेट्टीवार म्हणाले, 'ते भाजपचे कार्यकर्ते नाहीत. ते पक्षाने पोसलेले गुंड आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांचा अपमान केल्याने आंदोलन करत होतो. आम्ही कोणाच्या अंगावर दगड फिरकावला नाही. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय. तर भाजप पक्षाचे कार्यकर्त्याकडून कार्यलयावर दगडफेक आणि खुर्च्या तोडल्या जात असतील. कोणाचा जीव घेण्याचा प्रयत्न होत असेल. तर परिस्थिती गंभीर आहे. एकीकडे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. त्यादरम्यान परभणी आणि बीडमध्ये भयंकर घटना घडल्या आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com