आयुक्तांनी 'नो पार्किंग, नो कार'चा फॉर्म्युला सुचवला, मुंबईकर म्हणाले - त्यापेक्षा पार्किंगची सुविधा उपलब्ध करा

तुमच्याकडे तुमच्या मालकीची पार्किंगची जागा नसेल, तर तुम्ही कार (Car) विकत घेऊ शकत नाही.
No Parking No Car
No Parking No CarSaam Tv
Published On

भूषण शिंदे -

मुंबई: तुम्ही कार विकत घेताय, पण तुमच्याकडे कार पार्क करायला स्वतःच्या मालकीची पार्किंगची जागा आहे का? बसला ना आश्चर्याचा धक्का. हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. पण हे आम्ही नाही तर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे म्हणत आहेत (Mumbai Commissioner suggest No parking No car Mumbaikar are not happy with this).

No Parking No Car
Sanjay Pandey:"महिला पोलिसांची 8 तास ड्यूटी करू शकलो नाही", डीजीपी संजय पांडे यांनी बोलून दाखवली खंत,पाहा व्हिडीओ

पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांनी ट्विट करत "नो पार्किंग नो कार (No Parking No Car)" असा एक जुनाच अडगळीत पडलेला फॉर्म्युला सुचवला आणि याच्या चर्चा रंगू लागल्या. म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मालकीची पार्किंगची जागा नसेल, तर तुम्ही कार (Car) विकत घेऊ शकत नाही.

यावर अनेक मुंबईकरांनी काहीशी नाराजी व्यक्त केली आहे. या फॉर्म्युलापेक्षा पार्किंगची (Parking) सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असा सल्लाच मुंबईकरांनी पोलीस आयुक्तांना सुचवला आहे.

अद्याप हा निर्णय झाला नसला तरी "नो पार्किंग, नो कार" फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा भविष्यात असा काही निर्णय जर झालाच तर फार आश्चर्य मुंबईकरांनी वाटून घेऊ नये.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com