Mumbai Local : मध्य रेल्वे भरदुपारी रखडली! कल्याण-ठाकुर्ली दरम्यान पेंटाग्राफ तुटला, प्रवाशांचे हाल

Mumbai Local Train : डाऊन धीम्या मार्गावरील ठाकुर्लीकडून कल्याणकडे कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय. लोकल रेल्वे आपल्या गंतव्य ठिकाणी ५ते १० मिनिटे उशिराने पोहोचत आहेत.
Central Local Railway
Central Local Railway saam Tv

(अजय दुधाणे)

Mumbai Local Railway Services Disrupts:

लोकलचा पेंटाग्राफ तुटल्यामुळे कल्याण-मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झालीय. याामुळे मध्य रेल्वेच्या मुंबईहुन कल्याणकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झालाय. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घटना ही घटना दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली घडलीय. (Latest News)

डाऊन धीम्या मार्गावरील ठाकुर्लीकडून कल्याणकडे कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा पेंटाग्राफ  तुटला. ही घटना नेतिवली पत्रीपुलाजवळ घडल्याने लोकल सेवा विस्कळीत झालीय. कल्याणजवळ ईएमयू लोकल ट्रेनचा पेंटाग्राफ अडकला. यामुळे मध्या रेल्वे अप मार्गावरील जलद मार्ग प्रभावित झालीय. लोकल रेल्वेची ५वी लाईन तात्पुरती प्रभावित झाली असून भर उन्हात प्रवाश्यांचे हाल होत आहेत.

रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू असून लोकल सेवा जलद मार्गावर वळविण्यात आलीय. यामुळे लोकल ५ ते १० मिनिटें उशिराने धावत आहे.

या लोकल रेल्वे गाड्यावर परिणाम

BB DIV, (CLA/KYN), I/R FROM ECOR/BB AT 1245-

KYN - AT 1235 , EMPTY RAKE OF DI-21 (12 CAR/SAC/KCS)PANTO ENTANGLED AT KYN X OVER PT -106,104,102 .

U/NO- 1005/1006/1007/1008,C/NO-1006/C

UP TH ,DN TH ,5TH LINE AFFECTED,

1310 – I/R FROM ECOR/BB THAT OHE WIRE ALSO BKN.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com