Mumbai Best Bus Accident: बसच्या चाकाखाली आली दुचाकी,चालकाचा कोपरापासून तुटला हात

Best Bus Hit Bike: अपघाताप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय युवराज पाटील (३६ वर्षे) असं चालकाचं नाव आहे.
Mumbai Best Bus Accident
Best Bus Hit BikeSaam Tv
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

मुंबईच्या अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साठे चौकात बेस्ट बसचा मोठा अपघात झाला. बेस्ट बसच्या चाकाखाली दुचाकी आल्यानं दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा हात कोपरापासून तुटला. इस्माईल सुरतवाला (३५ वर्षे)या दुचाकी चालवणाऱ्याचं आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बस चालक विजय युवराज पाटील (३६ वर्षे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी बेस्ट बस चालक विजय पाटील याला अटक केली असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दाखल केलेल्या आरटीआयच्या उत्तरात बेस्टच्या प्रशासनाने ही माहिती दिली होती.

५ वर्षात ८३४ बेस्ट बस अपघात

मागच्या ५ वर्षांमध्ये बेस्टचे ८३४ बस अपघात झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनाने दिलीय. यात ८८ जीवितहानी झाल्याची कबूलीही बेस्टने दिली आहे. मरणांकत आणि जखमींना एकूण ४२.४० कोटी रुपयांची आर्थिक नुकसान भरपाई देण्यात आलीय. या पाच वर्षात १४ चालकांना बडतर्फ करण्यात आलंय. तर २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com