Bandra Kurla Complex: मुंबईत MMRDA च्या इमारतीत बॉम्बची अफवा, पोलिसांनी केला परिसर रिकामा

Jio World Convention Centre: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फॅमिली कोर्टच्या मागे MMRDA ची इमारत आहे या इमारतीच्या बाजूला जिओ वर्ल्ड कन्वेंशन सुद्धा आहे.
Bandra Kurla Complex
Bandra Kurla ComplexSaam Digital
Published On

संजय गडदे

मुंबईतील वांद्रे कुर्ला काम्प्लेक्स येथील MMRDA च्या इमारतीच्या पार्किंगमध्ये एका वाहनात बॉम्ब असल्याची अफवा समोर आली होती. त्यांनतर पोलिसांनी घडनास्थळी दाखल होऊन परिसर रिकामा केला होता. मात्र घटनास्थळी कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू आढळली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान बॉम्ब असल्याची माहिती दिलेला चालक नशेत आढळला असून त्याची चौकशी सुरू आहे.

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथील फॅमिली कोर्टच्या मागे MMRDA ची इमारत आहे या इमारतीच्या बाजूला जिओ वर्ल्ड कन्वेंशन सुद्धा आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा देखील याच भागात असल्याने मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान या दौऱ्याच्या आधी बॉम्बची अफवा पसरल्यामुळे सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या बॉम्बशोधक व बॉम्ब नाशक पथकाची गाडी घटनास्थळावर दाखल होऊन इमारतीमध्ये बॉम्ब आहे का की निनावी कॉल आहे या संदर्भात पोलीस सर्च ऑपरेशन सुरू केले होते.

Bandra Kurla Complex
Rahul Narvekar: 'आदेशाचं पालन केलं जाईल, परंतु', सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर नार्वेकरांनी दिली पहिली प्रतिक्रिया

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स MMRD पार्किंगमधील एका वाहनात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. सुरक्षा यंत्रणांचीही धावपळ उडाली होती. माहिती मिळताच तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी घेतली आणि परिसर रिकामा केला. नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं होत. सुदैवाने परिसरात कोणतीच संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. दरम्यान बॉम्बची माहिती दिलेल्या चालकाला पोलसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी आहे.

Bandra Kurla Complex
Mega Block News: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, असं असेल नवीन वेळापत्रक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com