Mumbai : परप्रांतियांकडून मराठी तरूणाला जबर मारहाण, मराठी माणसाला धंदा करण्यास मज्जाव, मुंबईतल्या घटनेनं खळबळ

Mumbai News : मुंबईमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयाकडून मराठी माणसावर हल्ला झाला आहे. परप्रांतीयाकडून बेकायदेशीर पदपथ अडवून मराठी माणसाला धंदा करण्यास मज्जाव करण्यात आला. प्रकरण पोलिसांत पोहचले आहे.
Marathi Youth Faces Violence by Outsiders in Santacruz
Marathi Youth Faces Violence by Outsiders in Santacruz
Published On

संजय गडदे

Mumbai Marathi News : कल्याण आणि नालासोपारा येथील मराठी माणसावर परप्रांतियांकडून हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच आता मुंबईच्या सांताक्रुज पूर्वेकडील मुंबई विद्यापीठाच्या परिसरात परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्वतःच्या राज्यात मराठी माणसाला मात्र हाल सोसावे लागत असल्याची चर्चा आता रंगली आहे.

या प्रकरणी मराठी तरुणाने बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, मात्र पोलिसांनी क्रॉस गुन्हा दाखल करून घेतला. यानंतर पुन्हा परप्रांतीयाने मराठी तरुणाला मारहाण करून त्याचे डोके फोडून चर्चा करणे या प्रकरणी आता मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली. उद्या बीकेसी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांना जाब विचारणार आहे.

Marathi Youth Faces Violence by Outsiders in Santacruz
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात फेब्रुवारीचे १५०० रूपये कधी येणार? अजित पवार यांनी तारीख सांगून टाकली

मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रुज पूर्वेकडील मुंबई विद्यापीठाच्या बाहेरील सांताक्रुज चेंबूर जवळ रस्त्याच्या पदपथावर अनेक नर्सरी अवैधपणे उभ्या राहिल्या आहेत. इथे मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांच्या नर्सरी आहेत. याच भागात मराठी तरुणांकडून नर्सरी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात असताना परप्रांतीयाकडून मराठी तरुणाला शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मराठी तरुणाने परप्रांतीय विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र बीकेसी पोलिसांनी दोघांविरोधात क्रॉस गुन्हा दाखल करून घेतला, त्यानंतर त्यांना समजावून पुन्हा भांडण करू नका अशी समज देऊन सोडून दिले. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागात परप्रांतियाकडून मराठी तरुणाला सुविधा करत मारहाण करण्यात आली यात मराठी तरुणाचे डोके फुटले.

यानंतर पुन्हा एकदा मराठी तरुणाने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. उलट परप्रांतीकडून आता त्या मराठी तरुणाला घाबरवण्यासाठी महिलांचा वापर केला जात आहे. त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देखील आता परप्रांतीय तरुणांनी दिली.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सातत्याने परप्रांतीयांकडून मराठी तरुणांवर कुटुंबावर हल्ले होत आहेत. सांताक्रुज येथील या घटनेची दखल मराठी एकीकरण समितीने घेतली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आणि पोलिसांना जाब विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे सदस्य बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार असल्याची माहिती सांताक्रुझ मराठी एकीकरण समितीचे नितेश शिंदे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com