Mumbai Airport: मुंबईत आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO

Mumbai Airport Waterlogging: मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई एअरपोर्टवर पाणी साचले आहे. रनवेवर पाणी साचल्यामुळे विमानाचे लँडिंग करताना अडचणी येत आहेत. तरी देखील एका पायलटने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. या पायलटचे कौतुक होत आहे.
Mumbai Airport: मुंबईत आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO
Mumbai Airport WaterloggingSaam Tv
Published On

Summary Pointers in Marathi

  • मुंबई विमानतळावर मुसळधार पावसाचा फटका.

  • एअरपोर्ट पाण्याखाली गेले आहे. रनवेवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

  • विमानसेवा उशिराने सुरू आहे त्यामुळे प्रवासी अडचणीत आले आहेत.

  • पाऊस कायम राहिल्यास विमानसेवा पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता.

मुंबईत कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई विमानतळाला बसला आहे. विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रनवेवर गुडघाभर पाणी साचल्यामुळे विमानाचे लँडिंग आणि टेक ऑफ करण्यास अडचणी येत आहेत. एअरपोर्टवर पाणी साचले असताना आणि खराब हवामान असताना देखील एका विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. त्यामुळे या विमानाचे पायलट निरज शेट्टी यांचे कौतुक केले जात आहे.

विमानतळावर पाणी साचलेले असताना देखील विमानाचे लँडिंग करण्यात आले. या विमानात असलेल्या प्रवासी देखील घाबरले होते. पण विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. या विमानाचा लँडिंग करतानाचा आणि लँडिंग केल्यानंतरचे व्हिडीओ समोर आले आहेत. विमानतळावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून या विमानात असलेल्या प्रवाशांना सुरक्षित खाली उतरवले जात आहे. या विमानाची चाकं पाण्यामध्ये बुडाली असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

सध्या मुंबई विमानतळ परिसरामध्ये तुफान पाऊस पडत आहे आणि हवेचा देखील वेग प्रचंड आहे त्यामुळे विमानसेवेवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. मुंबई विमानतळावर पाणी साचल्यामुळे प्रवासी अडकून पडले आहेत. विमानसेवा उशिराने सुरू असल्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होताना दिसत आहे. जर मुंबईत असाच पाऊस सुरू राहिला तर विमानसेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai Airport: मुंबईत आभाळ फाटलं! मुसळधार पावसामुळे एअरपोर्ट पाण्याखाली, विमानसेवेवर परिणाम; पाहा VIDEO
Mumbai Rain : मुंबईत पावसाचा कहर! ६ तासांत १७७ मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com