मुंबईत गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
फक्त ६ तासांत तब्बल १७७ मिमी पाऊस नोंदवला गेला असून हा सलग तिसरा दिवस मुसळधार पावसाचा ठरला आहे.
सायन, दादर, अंधेरी, बांद्रा, किंग्ज सर्कल यासह १४ ठिकाणी पाणी साचले असून ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मोठे ट्रॅफिक जॅम झाले आहेत.
स्थानिक रेल्वे सेवांवरही मोठा परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या ४५ मिनिटांपर्यंत उशिरा धावत आहेत. तर कुर्ला ते दादर दरम्यान काही गाड्या थांबवाव्या लागल्या.
किंग्ज सर्कल येथे पाण्यात अडकलेल्या शाळेच्या बसमधील ६ मुलांना पोलिस व बीएमसीच्या पथकांनी सुखरूप बाहेर काढले.
परिस्थिती लक्षात घेऊन बीएमसीने मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना तातडीची सुट्टी दिली आहे.
ठाणे जिल्ह्यातील शाळाही १९ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे.
हिंदमाता परिसरातील पूरस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बीएमसीने सर्व ७ पंप कार्यरत केले आहेत.
हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून अतीवृष्टी व उच्च भरतीची शक्यता व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपत्कालीन बैठकीत परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडू नये, असे प्रशासनाचे आवाहन आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.