Mumbai Crime News: मुंबई एअरपोर्टवर कस्टमची मोठी कारवाई; 13 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त

Mumbai Airport: या प्रवाशाविरोधात सीमा शुल्क विभागाने कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे.
narcotics seized
narcotics seizedANI
Published On

Mumbai News: मुंबई एअरपोर्टवर (Mumbai Airport) सीमा शुल्क विभागाने (customs) मोठी कारवाई केली आहे. परदेशातून भारतामध्ये आलेल्या नागरिकाकडून तब्बल 1.3 किलो कोकेन (cocaine seized) जप्त केले. मुंबई एअरपोर्टवर दाखल झालेल्या या परदेशी नागरिकाविरोधात सीमा शुल्क विभागाने कारवाई करत त्याला अटक केली आहे. या प्रवाशाने अतिशय शिताफिने हे कोकेन बॅगेमध्ये लपवले होते. पण मुंबई एअरपोर्टवर दाखल होताच त्याच्या प्लॅनची पोलखोल झाली.

narcotics seized
Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वर अपघातांचे सत्र सुरुच! भरधाव कार 30 फूट खाली कोसळली; पतीचा मृत्यू,पत्नी आणि मुलगा जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई एअरपोर्टवर सीमा शुल्क विभागाने 1 जुलै रोजी ही कारवाई केली. एका परदेशी नागरिकाकडून सुमारे 1.3 किलो कोकेन जप्त केले. या कोकेनची किंमत 12.98 कोटी रुपये इतकी आहे. या प्रवाशाविरोधात कारवाई करत त्याला अटक करण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाकडून या व्यक्तीची चौकशी सुरु आहे. हे कोकेन आदिस अबाबा येथून भारतात आणण्यात आले होते. आरोपीने हे अंमली पदार्थ नेमकं कोणाकडून आणि कोणाला देण्यासाठी भारतात आणले होते याचा तपास सुरु आहे.

अटक करण्यात आलेली व्यक्ती ही नैनितालचा रहिवासी आहे. या वक्तीला भारतामध्ये कोकेन आणण्यासाठी एका महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार केलो होते, अशी माहिती समोर येत आहे. सीमा शुल्क विभागाने अटक केलेल्या व्यक्तीने कशापद्धतीने कोकेन आपल्या बॅगेमध्ये लपवले होते. ते बाहेर काढतानाचा व्हिडिओ तयार केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

narcotics seized
Gujarat Weather Update News: गुजरातमध्ये पावसाचा कहर; पूरसदृश स्थितीने गावांचा संपर्क तुटला, आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे याच वर्षी जानेवारी महिन्यातही सीमा शुल्क विभागाने मुंबई विमानतळावर एका परदेशी नागरिकाविरोधात मोठी कारवाई केली होती. त्या व्यक्तीकडून तब्बल 28 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले होते. दरम्यान, मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने जूनमध्ये मोठी कारवाई केली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईच्या डोंगरीच्या एएमआर रिजनमधील मोठ्या अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये तस्करांकडून 50 कोटी किमतीचे 20 किलो अंमली पदार्थ जप्त केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com