Samruddhi Mahamarg Accident: 'समृद्धी'वर अपघातांचे सत्र सुरुच! भरधाव कार 30 फूट खाली कोसळली; पतीचा मृत्यू,पत्नी आणि मुलगा जखमी

Chatrapati Sambhajinagar Car Accident: संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला.
Samruddhi Mahanarg Accident
Samruddhi Mahanarg AccidentSaam Tv
Published On

नवनीत तापडिया, संभाजीनगर

Chatrapati Sambhajinagar: समृद्धी महामार्गावर अपघाताचे (Samruddhi Mahanarg Accident) सत्र सुरुच आहे. रोज या महामार्गावर अपघात होऊन अनेकांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहेत. बुलडाण्यामध्ये (Buldhana Bus Accident) समृद्धी महामार्गावर बसला भीषण अपघात होऊन 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर कारला भीषण अपघात (Samruddhi Mahanarg Car Accident) झाला असून यामध्ये पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.

Samruddhi Mahanarg Accident
Maharashtra Rain Update: राज्यात पुढचे ५ दिवस पडणार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर कारला अपघात झाला आहे. संभाजीनगर तालुक्यातील जयपूर-भांबर्डा शिवारात पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. संभाजीनगरहून जालनाच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. ही भरधाव कार महामार्गाच्या डाव्या बाजूला जवळपास 30 फूट खाली कोसळली. या अपघातामध्ये चालक पतीचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले आहेत.

Samruddhi Mahanarg Accident
ENG vs AUS: Lords च्या मैदानावर वातावरण तापलं! वॉर्नर,ख्वाजावर MCC च्या सदस्यांनी चढवला हल्ला; पाहा VIDEO

या भीषण कार अपघातामध्ये सुशीलकुमार थोरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील रहिवासी आहेत. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेली त्यांची पत्नी आणि बाळ हे या आपतात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले आहे. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच करमाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे.

दरम्यान, बुलडाण्यातील सिंदखेडराजा येथे समुद्धी महामार्गावर बसला अपघात झाला होता. या अपघातामध्ये बसने सर्वात आधी एका खांबाला धडक दिली. त्यानंतर ही बस डिव्हायडरला धडकून काही अंतर घसरत गेली. त्यामुळे बसच्या डिझेलची टाकी फुटली आणि बसला भीषण आग लागली होती. बसला लागलेल्या या आगीमध्ये होरपळून 26 प्रवाशांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com