Air Pollution : मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय, प्रदुषण अत्यंत धोकादायक पातळीवर

Mumbai Air Pollution News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या हवेची गुणवत्ता अतिशय खालावत चालली आहे. मुंबईकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
Mumbai Air Pollution
Mumbai Air Pollution
Published On

मुंबई: (Mumbai Air Quality Today) मुंबईतील काही उपनगरांमध्ये हवेतील सूक्ष्मकण PM2.5 ची पातळी 150 µg/m³ पेक्षा अधिक आहे काल ही पातळी 100 µg/m³ होती, प्रदुषणाची ही पातळी राष्ट्रीय सुरक्षित मर्यादेपेक्षा खूप जास्त आहे. या प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून स्थानिक उपाययोजनांची तातडीने गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईकरांसाठी आरोग्याच्या दृष्टीने ही परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

मुंबईत कुर्ला भागातला AQI सध्या 350 आहे. हा आकडा दिल्लीच्या प्रदुषणाइतकाच आहे. वाढत्या प्रदुषणामुळे अनेकांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्यांना शक्य आहे असे लोकं घरात घरात एअर प्युरीफायर लावत आहेत.  विशेषतः शिवाजीनगर (चेंबूर), कांदिवली आणि देवनार हे ठिकाणे मुंबईतील महत्त्वाचे प्रदूषण केंद्र म्हणून ओळखली गेली आहेत. बांधकाम धूळ, वाहनांचे उत्सर्जन आणि कचरा प्रक्रिया केंद्रे ही येथे प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत, असे 'डिकोडिंग अर्बन एअर: हायपरलोकल इनसाइट्स इन PM2.5 प्रदूषण अॅक्रॉस इंडियन मेट्रोपॉलिसेस' या अहवालात म्हटले आहे.

असा आहे मुंबईतील हवा गुणवत्ता अहवाल

नोव्हेंबर 2024 दरम्यान, मुंबईत 27 वायुप्रदूषण निरीक्षण केंद्रे सक्रिय होती. शहरातील PM2.5 च्या सरासरी पातळी 66 µg/m³ इतकी नोंदवली गेली. शिवाजीनगर, कांदिवली पश्चिम आणि मालाड पश्चिम हे मुंबईतील सर्वाधिक प्रदूषणग्रस्त भाग म्हणून उदयास आले आहेत. हा अहवाल Respirer Living Sciences (RLS) या क्लायमेट टेक प्लॅटफॉर्मने सादर केला आहे. RLS ने हायपरलोकल हवा गुणवत्ता निरीक्षणाद्वारे पारंपरिक पद्धतींनी दुर्लक्षित केलेल्या प्रदूषण केंद्रांचे विश्लेषण सादर केले आहे.

हायपरलोकल निरीक्षणामुळे प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक स्पष्ट आणि स्थानिक उपाययोजना करता येतील, असे अहवालात नमूद केले आहे. यामुळे, धोरणकर्ते, शहरी नियोजक आणि नागरिकांना धोकादायक ठिकाणांवर उपाययोजना करण्यास मदत होईल. शहरी भागांतील वायुप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी त्वरित उपाययोजनांची गरज असून, स्वच्छ तंत्रज्ञान स्वीकारणे, कमी उत्सर्जन क्षेत्रांची रचना करणे आणि प्रदूषण केंद्र कमी करणे हे पुढील धोरणात्मक पाऊल ठरेल.

Edited By- नितीश गाडगे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com