Mumbai Accident Video: वडिलांकडून चावी घेवून SUV पळवली अन्... अल्पवयीन मुलाने वृद्धाला उडवले; भीषण अपघाताचा VIDEO

SUV Accident Viral CCTV Footage: अल्पवयीन मुलाने गाडी चालवत अपघात केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मुलाचा ताबा सुटल्याने आधी रिक्षाला धडक दिली अन् वृद्धालाही उडवले.
Mumbai News  SUV Accident Viral Video
Mumbai News SUV Accident Viral VideoSaamtv

संजय गडदे, प्रतिनिधी

SUV Accident Mumbai CCTV Footage:

वाहतुकीचे नियम न पाळल्याने भीषण अपघात झाल्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. वाहन चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि बेदरकारपणे गाडी चालवल्याने नाहक निष्पापाचा बळी जातो. मुंबईमधून (Mumbai) एक असाच धक्कादायक अपघाताचा प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलाने गाडी चालवून वृद्ध नागरिकाला जखमी केल्याच्या घटनेचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Mumbai News  SUV Accident Viral Video
Ganpat Gaikwad News : नाना पाटेकरांच्या वक्तव्याचे गणपत गायकवाडांकडून समर्थन; महापालिकेवर केला भ्रष्टाचाराचा आरोप

१४ वर्षीय मुलाकडून SUV चा अपघात..

लहान मुलांना गाडी चालवायला देण्याची चूक अनेक पालक करतात. यामुळे अनेकदा भीषण अपघातही होतात. मुंबईच्या चांदिवली (Chandiwali) परिसरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय मुलाने आपल्या वडिलांच्या हातातून चावी घेवून त्यांची एसयुव्ही घेवून बाहेर पडला.

यावेळी त्याच्याकडून गाडीचा ताबा सुटल्याने एका वृद्ध नागरिकाला धडक दिली आहे. तसेच या अपघातात एका रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर मुलाने कारसह पळ काढला असून या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे.

आधी रिक्षाला धडक अन् वृद्धालाही उडवले..

चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ हा अपघात घडला. व्हिडिओमध्ये (Viral Video) तुम्ही पाहू शकता की सकाळच्या सुमारास वृद्ध नागरिक गेटबाहेर फिरताना दिसत आहेत. अचानक गेटमधून एक भरधाव एसयुव्ही इनोव्हा कार बाहेर पडते. कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती कार थेट आधी रिक्षा चालकाला आणि नंतर रस्त्यावर फिरणाऱ्या वृद्ध नागरिकास जोरदार धडक देते. (Viral Suv Accident Video Chandivali)

व्हिडिओ व्हायरल!

धडक दिल्यानंतर अल्पवयीन मुलगा कार घेवून तसाच सुसाट वेगात पुढे निघून जातो. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ धाव घेत तपास सुरू केला आहे. अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी आता साकिनाका पोलीस अधिक तपास करत आहेत. (Latest Marathi News)

Mumbai News  SUV Accident Viral Video
MHADA Housing Lottery: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! म्हाडाच्या ५ हजार ३०९ घरांसाठी निघणार लॉटरी; अर्जविक्री कधीपासून?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com